शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापी सर्व्हे: 'मंदिराचे अवशेष, शेषनाग-कमळाची कलाकृती', मिश्रा यांनी न्यायालात सादर केला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:17 IST

Kashi Vishwanath Gyanvapi Survey : अजय मिश्रा यांनी 6 मे आणि 7 मे रोजी केलेल्या सर्व्हेचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यावेळी ते एकटेच कोर्ट कमिश्नर होते. यावेळी व्हिडिओग्राफीही करण्यात आली होती. हा डेटाही न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

माजी एडव्होकेट कमिश्नर अजय मिश्रा यांनी वाराणसीन्यायालयात ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे अहवाल सादर केला आहे. यात, ज्ञानवापी परिसरात उत्तर ते पश्चिम भिंतीच्या कोपऱ्यात जुन्या मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. ज्यावर देवी-देवतांच्या कलाकृती आहेत. याशिवाय, उत्तरेपासून पश्चिमेकडे चालताना मध्यभागी शेषनागाची कलाकृती आणि नागाच्या फन्यासारख्या आकृत्याही दिसून आल्या आहेत. असा दावा अजय मिश्रा यांनी आपल्या सर्व्हे अहवालात केल्याचे सांगण्यात येत आहे.

अॅडव्होकेट कमिश्नर अजय मिश्रा यांनी वाराणसीन्यायालयाच्या आदेशानंतर 6 ने आणि 7 मे रोजी ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे केला होता. मात्र, या सर्व्हेला विरोध झाल्यानंतर त्यांना हा  सर्व्हे थांबवावा लागला होता. यानंतर, मुस्लीम पक्षाकडून न्यायालयाकडे अॅडव्होकेड कमिश्नर मिश्रा यांना हटविण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने मिस्लीम पक्षाची मागणी फेटाळली होती. याशिवाय, विशाल सिंह आणि अजय सिंह यांनाही कोर्ट कमिश्नर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. न्यायालयाने 17 मेपर्यंत ज्ञानवापी मशिदीत सर्व्हेकरून अहवाल सादर करण्याचे आदेशदिले होते.

अजय मिश्रा यांनी अहवालात केले असे दावे -अजय मिश्रा यांनी 6 मे आणि 7 मे रोजी केलेल्या सर्व्हेचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यावेळी ते एकटेच कोर्ट कमिश्नर होते. यावेळी व्हिडिओग्राफीही करण्यात आली होती. हा डेटाही न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालात मिश्रा यांनी काही नवीन गोष्टींचा उल्लेख केला आहे.

- अहवालानुसार, 6 मे रोजी बॅरिकेडिंगबाहेर उत्तरते पश्चिम असलेल्या भिंतीच्या कोपऱ्यावर जुन्या मंदिरांचे अवशेष आढळून आले. यावर देवी-देवतांच्या कलाकृती आढळून आल्या आहेत. तर काही कमळाच्या कलाकृतीही आढळून आल्या आहेत.

- दगडांच्या आतल्या बाजूला काही कमळाच्या आणि इतर आकृत्या असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

-  उत्तर-पश्चिम कोपऱ्यात गिट्टी सिमेन्टच्या सहाय्याने चबूतऱ्यावर नवे काम दिसते. वरील सर्व आकृत्यांची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे.

- उत्तरेकडून पश्चिमेकडे जाताना मध्यभागी दगडावर शेषनागाची आकृती, नागफना सारख्या आकृत्या तिसून आल्या आहेत. शिलेवर शेदऱ्या रंगाच्या नक्षीदार कलाकृतीही दिसून आल्या आहेत.

- एका शिलेवर देव विग्रह, ज्यामत चार मूर्तींचा आकार दिसतो, यावर शेंदूर लावलेला आहे. चौथी आकृती, जी मूर्तीसारखी दिसते, त्यावरही शेंदूर लावण्यात आलेला आहे.

- सर्व शिला दीर्घकाळापासूनच जमिनीवर पडून असल्याचे दिसत आहेत. हे एखाद्या मोठ्या इमारतीचे भग्न अवशेषांसारखे दिसतात. असे अनेक दावे मित्रा यांनी आपल्या अहवालात केले आहेत. 

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदVaranasiवाराणसीCourtन्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश