शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Gyanvapi Masjid Survey: ज्ञानवापीच्या सर्वेक्षण रिपोर्टवर सस्पेन्स, विशेष आयुक्त म्हणतात- रिपोर्ट तयार; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 10:36 IST

Gyanvapi Masjid Survey: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आहे का? सत्य बाहेर यायला किती वेळ लागेल? सर्वेक्षणाचा अहवाल आज न्यायालयात दाखल होणार का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळण्यावर सस्पेन्स कायम आहे.

Gyanvapi Masjid Survey: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचा पाहणी अहवाल आज न्यायालयात सादर होणार की नाही? संपूर्ण देशाला या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे, मात्र त्यावर सस्पेन्स कायम आहे. पाहणी अहवालाबाबत विशेष आयुक्त विशाल सिंह यांनी आज 12 वाजेपर्यंत अहवाल दाखल करणार असल्याचे सांगितले. पण, दुसरीकडे न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा यांचे सहाय्यक वकील आयुक्त अजय सिंह यांनी आज अहवाल सादर होणार नसल्याचे सांगितले आहे.

अजय सिंह म्हणाले की, अद्याप अहवाल आलेला नाही. सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी वाराणसी न्यायालयाने आजची तारीख निश्चित केली होती, परंतु सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर करण्यास विलंब होऊ शकतो. यानंतर काही वेळातच विशेष आयुक्त विशाल सिंह म्हणाले की, सर्वेक्षण अहवाल जवळपास तयार झाला आहे, थोडी भाषा आणि टायपिंगची चूक तपासावी लागेल. मला आशा आहे की आम्ही 12 वाजेपर्यंत न्यायालयात हजर होऊ शकू.

मात्र, न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी वेळ मागू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणाचे रेकॉर्डिंग 5 तासांपेक्षा जास्त झाले आहे, हे पाहता अहवाल तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे बोलले जात आहे. काही वेळातच हे स्पष्ट होईल की, आज पाहणी अहवाल न्यायालयात दाखल होणार की नाही?

17 मे सर्वेक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत 12 मे रोजी वाराणसी न्यायालयाने 17 मे पूर्वी पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आणि न्यायालयाचे आयुक्त बदलण्यास नकार दिला होता. मशिदीसह संपूर्ण संकुलाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच, विशाल सिंग यांना विशेष आयुक्त बनवण्यात आले, ते संपूर्ण टीमचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत अजय प्रताप सिंग यांचाही समावेश होता.

सर्वेक्षणाचे काम तीन दिवस चाललेवाराणसी न्यायालयाच्या आदेशानंतर काल (सोमवार) तीन दिवसांत ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी, हिंदू पक्षाने वजूखान्याजवळील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला. मशिदीच्या ज्या भागात शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे त्या भागाचे जुने फुटेजही समोर आले आहे.

मात्र, या चित्रांचा सर्वेक्षणाशी काहीही संबंध नाही. वजूखानामध्ये शिवलिंग मिळाल्याचा दावा समोर आल्यानंतर वाराणसी न्यायालयाने डीएम कौशल राज शर्मा यांना तात्काळ जागा सील करण्याचे आदेश दिले. तेथे कोणत्याही व्यक्तीच्या हालचालींवर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. यासोबतच वुजूवरही बंदी घालण्यात आली आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयMosqueमशिदTempleमंदिर