शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Gyanvapi Masjid: कोर्टाचा मोठा निर्णय! ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाची 'कार्बन डेटिंग' करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 15:45 IST

Gyanvapi Masjid: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची कार्बन डेटिंग करण्यास जिल्हा न्यायालयाने नकार दिला आहे.

Gyanvapi Masjid: उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगबाबत जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाची कार्बन डेटिंग होणार नाही, असा निर्णय जिल्हा न्यायालयाने दिला आहे. एके विश्वेश यांनी कार्बन डेटिंगची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाचा हा निर्णय हिंदू पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

16 मे रोजी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्या, वझुखान्यात एक कथित शिवलिंग सापडले होते. पण, मुस्लिम पक्षाकडून याला कारंजे म्हटले जात आहे. हे सापडल्यानंतर कार्बन डेटिंगची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळत म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कथित शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवावी. अशा स्थितीत कार्बन डेटिंगदरम्यान शिवलिंगाचे नुकसान झाले तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरेल. त्यामुळे सर्वसामान्यांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या जाऊ शकतात.

चार महिलांनी याचिका दाखल केली होतीवाराणसी न्यायालयाने श्रृंगार गौरी-ज्ञानवापी प्रकरण सुनावणीस योग्य मानले होते. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, हिंदू बाजूने 4 फिर्यादी महिलांनी कार्बन डेटिंगची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र, शृंगार गौरीच्या पूजेच्या परवानगीसाठी दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी सुरू राहणार आहे.

काय आहे ज्ञानवापी वाद?ही मशीद औरंगजेबाने बांधली असे मानले जाते. हिंदू बाजू म्हणते की मशिदीच्या आधी त्याच ठिकाणी मंदिर होते. मुघल शासक औरंगजेबाने 1699 मध्ये काशी विश्वनाथ मंदिर पाडून मशीद बांधली होती. भगवान विश्वेश्वराचे स्वयंभू ज्योतिर्लिंग मंदिरात विराजमान होते, असा दावा केला जातो. मंदिराचे अवशेषही मशिदीत सापडतात.

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदVaranasiवाराणसीCourtन्यायालय