ग्वाल्हेर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची ज्या ठिकाणी दररोज पूजा होते असे देशातील एकमेव मंदिरमध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आहे.या शहरात मंदिरासोबतच त्यांच्या नावाने एक शाळाही चालविली जाते. वाजपेयी चांगले वक्ता आणि कवी या शहरातच बनले. वाजपेयींच्या एका चाहत्याने सत्यनारायण टेकडीजवळ वाजपेयींचे मंदिर उभारले असून तेथे दररोज पूजापाठ, भजन-कीर्तन केले जाते. लोक दररोज या ठिकाणी दर्शनाला येतात. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच लोकांनी जड अंत:करणाने या ठिकाणी गर्दी केली होती. अटलबिहारी यांचे कुटुंबीय शिंदे छावणी भागात वास्तव्याला होते. त्यांचे वडील शिक्षक होते. ग्वाल्हेरच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. वाजपेयी यांनी गोरखी स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले होते. त्यांनी सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्याची नोंद असलेले रजिस्टर या शाळेने जपून ठेवले आहे. या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
ग्वाल्हेरमध्ये ‘अटल’ मंदिरात होते दररोज पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 06:47 IST