GVL Narasimha Rao, BJP on Pragya Singh Thakur's statement, BJP does not agree with this statement | साध्वी प्रज्ञा सिंह यांचं 'ते' मत वैयक्तिक, भाजपानं केले हात वर
साध्वी प्रज्ञा सिंह यांचं 'ते' मत वैयक्तिक, भाजपानं केले हात वर

नवी दिल्लीः  भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा केला. 'त्या' विधानावरून भाजपानं हात वर केले आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या त्या मताशी भाजपा सहमत नाही. आम्ही त्या विधानाचा निषेध करतो. तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून भाजपा यासंदर्भात खुलासा मागणार असून, त्यांनी आपल्या विधानाची माफी मागावी, असं भाजपाचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटलं आहे.


मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. मात्र उमेदवारी मिळाल्यापासूनच साध्वी प्रज्ञा सिंह या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, आज त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा त्यांनी देशभक्त असा उल्लेख केला आहे. ''नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील. जे लोक त्याला दहशतवादी म्हणतात. त्यांनी स्वत:मध्ये एकदा डोकावून पाहावे. या निवडणुकीमधून अशा लोकांना उत्तर दिले पाहिजे, असे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले होते. तर काही दिवसांपूर्वी शहीद हेमंत करकरेंसंदर्भातही त्यांनी असंच वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळीही त्यांना त्या विधानावरून विरोधकांनी धारेवर धरलं होतं. 


Web Title: GVL Narasimha Rao, BJP on Pragya Singh Thakur's statement, BJP does not agree with this statement
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.