शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

गुरमीत राम रहीम ट्विटरवरुन आऊट, ट्विटर अकाउंट केलं बंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 19:53 IST

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने बलात्काराच्या आरोपात शिक्षा सुनाविलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याचं ट्विटर अकाउंट बंद केले आहे. 

नवी दिल्ली, दि. 01 - मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने बलात्काराच्या आरोपात शिक्षा सुनाविलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याचं ट्विटर अकाउंट बंद केले आहे. गेल्या आठवड्यात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने गुरमीत राम रहीमला दोन बलात्काराच्या आरोपात दोषी ठरविले होते. दरम्यान, ट्विटरने काही गाइडलाइन दिल्या आहेत. या गाइडलाइन्स जे कस्टमर्स फॉलो करत नाहीत, त्यांचे ट्विटरवरील अकाउंट ब्लॉक करण्यात येते.  ट्विटरवर गुरमीत राम रहीम याचा अकाउंच होते, तसेच अनेक फॉलोवर्स आहेत. गुरमीत राम रहीम ट्विटरवर सतत अॅक्टिव्ह राहत होता. मात्र, त्याच्या नावाने ट्विटरवर सर्च केले असता Account Witheld असा मेसेज दाखविण्यात येत आहे.  बराचवेळा  ट्विटरकडून सेफ्टीसाठी कोणाचेही अकाउंटला एखाद्या देशापुरते बंद करण्यात येते. गुरमीत राम रहीम याचे सुद्धा ट्विटर अकाउंट फक्त भारतापुरते Witheld करण्यात आले आहे, असे नोटिफिकेशनमध्ये दाखविण्यात येत आहे. दरम्यान, ट्विटरने स्वत: गुरमीत राम रहीम याचे ट्विटर अकाउंट Witheld केले आहे की सरकारी एजन्सीकडून करण्यात आले आहे, याबाबत अद्याप काही समजू शकले नाही.  

राम रहीमची निकटवर्तीय आणि दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस जारी

- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची दत्तक मुलगी हनीप्रीत सिंगविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. हनीप्रीत सिंग सध्या फरार असून हरियाणा पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे. न्यायालयाने गुरमीत राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवून नेण्याचा कट आखल्याचा आरोप हनीप्रीत सिंगवर करण्यात आला आहे. पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली असल्याने हनीप्रीत सिंग देश सोडून जाऊ शकत नाही. 

जेलमधील कैदीही राम रहीमवर संतापलेत, मारहाण करतील याची पोलिसांना भीती

- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला जेलमध्ये इतर कैद्यांपासून लांब ठेवण्यात आले आहे. राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारामुळे कारागृहातील कैदी संतापले असून ते राम रहीमवर हल्ला करण्याची भीती आहे , अशी माहिती जामिनावर बाहेर आलेल्या कैद्याने दिली आहे. 

 

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीम