शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्षोभक विधाने करणाऱ्या गुपकार गटाच्या नेत्यांना अमित शाहांनी सुनावले खडेबोल, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Updated: November 17, 2020 15:33 IST

Amit Shah : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारताची जनता राष्ट्रहिताविरोधात तयार झालेल्या कुठल्याही अपवित्र ग्लोबल आघाडीला सहन करणार नाही.

ठळक मुद्देगुपकार गँग काश्मीरमध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप घडवून आणू इच्छित आहेतगुपकार गँग भारताच्या तिरंग्याचा अपमान करते. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा गुपकार गँगच्या अशा कारवायांना पाठिंबा आहे काय. काँग्रेस आणि गुपकार गँग जम्मू आणि काश्मिरला पुन्हा एकदा दहशतीच्या युगात घेऊन जाऊ इच्छित आहेत.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात आक्रमक झालेल्या गुपकार गटाच्या प्रक्षोभक विधानांची दखल अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी घेतली आहे. तसेच या नेत्यांनी देशभावनेविरोधात कारवाया सुरू ठेवल्या तर त्यांचा अंत निश्चित आहे. शाह यांनी ट्विटरवर गुपकार गटाचा उल्लेख गुपकार गँग असा केला. तसेच ही मंडळी काश्मीरमध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप घडवून आणू इच्छित आहेत, असा आरोप अमित शाह यांनी केला. अमित शाह यांनी गुपकार गटाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले की, गुपकार गँग भारताच्या तिरंग्याचा अपमान करते. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा गुपकार गँगच्या अशा कारवायांना पाठिंबा आहे काय. त्यांनी देशातील जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तसेच या ग्लोबल आघाडीचा हेतू हा कुठल्याही प्रकारे कलम ३७० लागू करणे हाच आहे.

अमित शाह आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणाले की, काँग्रेस आणि गुपकार गँग जम्मू आणि काश्मिरला पुन्हा एकदा दहशतीच्या युगात घेऊन जाऊ इच्छित आहेत. ते दलित, महिला आणि आदिवासींचे हक्क हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळेच देशातील जनता प्रत्येक ठिकाणाहून काँग्रेसला रिजेक्ट करत आहे. 

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारताची जनता राष्ट्रहिताविरोधात तयार झालेल्या कुठल्याही अपवित्र ग्लोबल आघाडीला सहन करणार नाही. गुपकार गटाने देशासोबत चालावे अन्य़था देशातील जनता त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणतील.

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसArticle 370कलम 370