गुमथळा... पालकमंत्री
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:12+5:302015-02-14T23:52:12+5:30
सर्वांना पाणी मिळणार - पालकमंत्री

गुमथळा... पालकमंत्री
स ्वांना पाणी मिळणार - पालकमंत्रीगुमथळा : सर्वांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळणे ही काळाची गरज असून त्यासाठी शासनस्तरावर योजना राबविल्या जात आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कामठी तालुक्यातील गुमथळा येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ९२ लाख रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना तसेच सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य विनोद पाटील, कुंदा आमधरे, पं.स. सभापती अनिता चिकटे, उपसभापती देवेंद्र गवते, पं.स. सदस्य नरेश शेंडे, विमल साबळे, संगीता तांबे, सरपंच मंगला पेठे, उपसरपंच सुनील डाफ, माजी जि. प. सदस्य अनिल निधान, भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश चिकटे, आनंद राऊत, मोबीन पटेल, खंडविकास अधिकारी अरुण निंबाळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास दिलीप मुळे, अंबर वाघ, नानू ठाकरे, किरण पानतावणे, कमला खेडकर, माधुरी वाघ आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)