शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पत्नीच्या शरीराचे 11 तुकडे करुन निर्घृण हत्या, कारण वाचाल तर थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 09:13 IST

... म्हणून त्यानं पत्नीच्या शरीराचे केले 11 तुकडे

अहमदाबाद - गुजरातमधील सूरत येथील थरकार उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करुन तिच्या शरीराचे तब्बल 11 तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या केलेल्या पत्नीच्या मृतदेहाच्या तुकड्यांची जंगलामध्ये विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी पतीच्या संशयास्पद हालचाली पाहून तेथील काही जणांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला अटक केली आणि त्याच्या पत्नीच्या मृतदेहाचे तुकडेदेखील ताब्यात घेतले. 

सूरतमधीर राणी तलाव परिसरात सोमवारी (16 एप्रिल ) ही घटना घडली आहे. येथील रहिवासी शाहनवाज युसुफ शेखनं दुसरी पत्नी जुलेखाची निर्घृण हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तब्बल 11 तुकडे केले. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना त्याला कोणी तरी पाहिले व याबाबतची माहिती पोलिसांना दिली. शाहनवाजला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराकडे धाव घेत तपासणी केली. यावेळी अत्यंत भयावह प्रकार समोर आला. तपासणीदरम्यान शहनवाजच्या पत्नीचे डोके आणि हात घरात आढळले.

यासाठी केली दुसऱ्या पत्नीची हत्यापोलीस तपासणीमध्ये शाहनवाजनं सांगितले की, त्याचा दोन वेळा निकाह झाला. दोन्ही पत्नीमध्ये दररोज कोणत्या-न्-कोणत्या कारणांवरुन भांडणं व्हायची. दररोजच्या वादाला कंटाळून शाहनवाजनं अखेर दुसरी पत्नी जुलेखाची हत्या केली आणि या गोष्टीचा कोणालाही थांगपत्ता लागू नये, यासाठी त्यानं पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने केलेले हत्याकांड अखेर उजेडात आलेत. 

दोन वर्षांपूर्वी केला होता जुलेखासोबत निकाह

विवाहित असलेला शाहनवाज जुलेखाच्या प्रेमात पडला होता आणि दोन वर्षांपूर्वी त्यानं जुलेखासोबत निकाह केला. जुलेखासोबत निकाह झाल्यानंतर शाहनवाज पहिल्या पत्नीसोबतच एकत्र राहू लागला होता. मात्र यामुळे शाहनवाजच्या दोन्ही पत्नींमध्ये तुफान भांडणं होऊ लागली. दोघींमधली वादाला कंटाळून शेवटी त्यानं जुलेखाची हत्या केली. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या गुन्ह्यामध्ये शाहनवाजची पहिली पत्नी आणि बहीणदेखील सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

 

टॅग्स :MurderखूनSuratसूरत