शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

राजीनामा देण्याच्या ३ तास आधीच मोदींच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते रूपाणी, यामुळे गमवावी लागली खुर्ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 21:58 IST

CM Vijay Rupani Resigns : राजीनामा देण्यापूर्वी रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींसोबत एका कार्यक्रमाला हजेरीही लावली होती. पंतप्रधानांनी शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अहमदाबादमधील सरदारधाम भवनाचे उद्घाटन केले. यावेळी ते उपस्थित होते.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता ते राज्यपाल आचार्य देवव्रत यांना भेटण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांनी राजीनामाही दिला. यानंतर आता गुजरातमधील राजकीय हलचालींना वेग आला आहे. महत्वाचे म्हणजे, राजीनामा देण्यापूर्वी रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींसोबत एका कार्यक्रमाला हजेरीही लावली होती. पंतप्रधानांनी शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अहमदाबादमधील सरदारधाम भवनाचे उद्घाटन केले. यावेळी ते उपस्थित होते. (Gujarat why vijay rupani resigns from cm post here is the reasons )

या कारणांमुळे द्यावा लागला राजीनामा - जानकारांच्या मते, विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोविड महामारी. कोरोनाच्या दोन्ही लाटांदरम्यान, मुख्यमंत्री आणि त्यांचे व्यवस्थापन कोरोनाचा सामना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. त्यांना बऱ्याच वेळा कोरोनासंदर्भातील आपलेच निर्णयही मागे घ्यावे लागले. कोविड काळात झालेले लोकांचे मृत्यू आणि सरकारचे अयोग्य व्यवस्थापन यांमुळे राज्यातील लोकांमध्ये भाजप सरकारविरोधात रोषही वाढलेला होता. अशात, पक्षाने राज्यातील नेतृत्व बदलून लोकांचा रोषही शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला? लिहून आणलेलं उत्तर विजय रुपाणींनी वाचून दाखवलं, म्हणाले...

अधिकाऱ्यांसंदर्भात केंद्राकडे तक्रारी - विजय रुपाणी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अधिकारी वर्ग  वरचढ झाल्याच्या तक्रारी राज्य संघटना आणि अनेक आमदार सतत्याने केंद्राकडे करत होते. मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांवर पकड नाही, ते त्यांच्या मर्जीनेच निर्णय घेतात, एवढेच नाही तर ते आमदार आणि कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात, असे असे त्यांचे म्हणणे होते. 

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे, गुजरात प्रदेश भाजप अध्यक्ष सीआर पाटील आणि मुख्यमंत्री रूपाणी यांच्यात मतभेद असल्यासंदर्भातील बातम्याही येतच होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही, सत्ता आणि संघटना यांच्यात परस्पर समन्वय नसल्याचेही अनेक वेळा दिसून आले. यामुळेच, सीएम रुपाणी यांना बाजूला करून केंद्रीय नेतृत्व राज्याची कमान नव्या चेहऱ्याकडे सोपवू इच्छित अस्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

 

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीGujaratगुजरातBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी