शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Gujarat: विजय रुपाणी-नितीन पटेल नेतृत्वात निवडणूक लढवणार होते; २७ दिवसांत भाजपानं निर्णय बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 12:32 IST

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजयासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा विजय रुपाणी हेच मुख्यमंत्री होते.

ठळक मुद्देमध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले.गेल्या अनेक दिवसांपासून पटेल समुदायही भाजपावर नाराज होताभाजपानं विधानसभा निवडणुकीच्या १ वर्ष आधी मुख्यमंत्री चेहरा बदलण्याचा निर्णय घेतला.

अहमदाबाद - गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीने(BJP) त्यांचा मुख्यमंत्री बदलला आहे. कुणालाही काही भनक न लागताच गुजरातमध्ये विजय रुपाणी(Vijay Rupani) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि २४ तासांत भूपेंद्र पटेल(Bhupendra Patel) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले.

२७ दिवसांपूर्वीच भाजपानं आगामी २०२२ विधानसभा निवडणूक विजय रुपाणी-नितीन पटेल यांच्या जोडीसोबत लढणार असल्याचं जाहीर केले. नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी जेव्हापासून अहमदाबाद सोडून दिल्लीचं तख्त सांभाळलं आहे. तेव्हापासून गुजरातमध्ये भाजपाच्या नेतृत्वावर संकट येत आहे.

नरेंद्र मोदी यांच्यानंतर आनंदी बेन पटेल यांनी कमान सांभाळली. परंतु त्यांच्याविरोधात लोकांचा आक्रोश वाढला त्यानंतर भाजपाने नेतृत्वात बदल करुन विजय रुपाणी यांच्यावर जबाबदारी दिली. अलीकडेच विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळाची ५ वर्ष पूर्ण केली. १६ ऑगस्ट रोजी गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर पाटील यांनी आगामी निवडणूक विजय रुपाणी आणि नितीन पटेल यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं विधान केले होते. गुजरातमध्ये अनेक दिवसांपासून नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यावेळी पक्षाने रुपाणी-पटेल जोडी चांगले काम करत असून बदल करण्याची गरज नाही असं म्हटलं.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजयासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा विजय रुपाणी हेच मुख्यमंत्री होते. मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले. ज्यामुळे रुपाणी यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली. गेल्या अनेक दिवसांपासून पटेल समुदायही भाजपावर नाराज होता. ही सगळी कारणं पाहता भाजपानं विधानसभा निवडणुकीच्या १ वर्ष आधी मुख्यमंत्री चेहरा बदलण्याचा निर्णय घेतला. पटेल समुदायातील भूपेंद्र पटेल यांना संधी देत समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. भाजपाने मागील काही दिवसांत कर्नाटक, उत्तराखंड याठिकाणचे मुख्यमंत्री बदलले. तर आसाममध्ये निवडणुकीनंतर नेतृत्वात बदल केला होता.

भाजपचे धक्कातंत्र कायम

गुजरातचे भावी मुख्यमंत्री म्हणून मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांसह काही जणांची नावे शर्यतीत होती. भूपेंद्र पटेल यांचे नाव अजिबात चर्चेत नव्हते. अशाच नावाची निवड करून भाजपचे आपले धक्कातंत्र कायम ठेवले आहे. कर्नाटक व उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री अनुक्रमे बी. एस. ये़डीयुरप्पा, तीरथसिंह रावत यांचेही अचानक राजीनामे घेतले होते. 

टॅग्स :Bhupendra Patelभूपेंद्र पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीVijay Rupaniविजय रूपाणीBJPभाजपाGujaratगुजरात