शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पती भाजप नेता, तर पत्नी आपची नगरसेवक; राजकीय मतभेद एवढे टोकाला गेले, की झाला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 17:02 IST

"या वादात एप्रिल महिन्यात चिराग यांनी मला मारहाण केली होती. यानंतर मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ते अद्यापही मला धमक्या देत आहेत."

सूरत - राजकीय मतभेदांमुळे गुजरातमधील सूरत येथे एका तरूण इंजिनिअर दांपत्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली. पत्नी आम आदमी पार्टीची (आप) नगरसेविका असून या जोडप्याने नुकताच एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला आहे. रुता दुधागरा आणि चिराग असे या दांपत्याचे नाव आहे. (Gujarat Surat councillor political differences divide from husband)

26 वर्षीय नगरसेविका रुता दुधागरा आता पति चिराग (28) यांच्यांकडून त्यांचे वैयक्तीक साहित्य, जसे शाळा आणि कॉलेजच्या मार्कशीट्स, काही महत्वाची कागदपत्रे, त्यांच्या नगरसेवकपदाशी संबंधित काही दस्तऐज, त्यांची मोपेड आणि लॅपटॉपसह इतर मौल्यवान साहित्य घेण्यासाठी कायदेशीर पर्याय शोधत आहेत.

पतीला घटस्फोटासाठी दिले 7 लाख रुपये -आयटी इंजिनिअरने सांगितले, की 'माझे पती गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार होते. यामुळे मी त्यांना 7 लाख रुपये दिले आणि त्यांनी माझे 90 ग्रॅमपेक्षा अधिक वजन असलेले दागिने घेतले आहेत. रोख दिलेले पैसे सेपरेशनसाठी होते, असे मी मानते. मात्र, आता मी माझे दस्तऐवज घेण्यासाठी कायदेशीर पर्याय शोधत आहे.'

दांपत्यानं साडेतीन लाखांना नवजात बालकाला विकलं; पोलिसांकडून ६ जणांना अटक

3 वर्षांपूर्वीच झाले होते लग्न -नगरपालिका निवडणुकीत दुधागरा यांना 54,754 मते मिळाली आणि त्यांनी फेब्रुवारी महिन्यात वार्ड 3, सरथाना-सिमाडा येथून भाजप उमेदवाराचा पराभव केला. त्या म्हणाल्या, 'माझ्याकडे कुठलाही राजकीय अनुभव नव्हता. मात्र, मी आपसोबत कल्याणकारी कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी मला नगरपालिका निवडणुकीत तिकीट दिले आणि मी सर्वाधिक अंतराने विजयी झाले.' तसेच आपले लग्न गेल्या तीन वर्षांपूर्वी कंप्यूटर इंजिनिअर चिराग सोबत झाले होते. त्यांना अद्याप मूल नाही.

'भाजप जॉइन करण्यासाठी टाकत होते दबाव' -रुता म्हणाल्या, 'माझे माझ्या पतीसोबत गेल्या एक वर्षापेक्षाही अधिक काळापासून मतभेद होते. मात्र, आम्ही अॅडजस्ट करत होतो. मात्र, माझ्या विजयानंतर काही आठवड्यांतच माझ्या पतीने माझ्यावर भाजपत सामील होण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. यासाठी त्यांना कोट्यवधींचा प्रस्तावही भेटला आसेल. मात्र, मी आम आदमी पार्टी सोडणार नाही.'

'झाडू'न सगळ्या जागा लढवणार; मोदी-शहांच्या होमग्राऊंडवर भाजपसमोर आव्हान

93 पैकी 27 जागा 'आप'कडे -रुता म्हणाल्या, 'या वादात एप्रिल महिन्यात चिराग यांनी मला मारहाण केली होती. यानंतर मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ते अद्यापही मला धमक्या देत आहेत आणि त्यांनी माझे महत्वाचे दस्तऐवजही परत केलेले नाहीत. यामुळे, आता मी कायदेशीर पर्याय शोधत आहे.' AAP ने शहरातील पाटीदार बहूल भागांत 93 पैकी 27 जागा जिंकल्या आहेत.

टॅग्स :GujaratगुजरातPoliticsराजकारणBJPभाजपाAAPआप