शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात दंगल प्रकरण : तिस्ता सेटलवाड गुजरात एटीएसच्या ताब्यात, मुंबईतून नेले अहमदाबादला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 09:06 IST

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दंगलीच्या कटाच्या आरोपातून मुक्त करणाऱ्या एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टला झाकिया यांनी आव्हान दिले होते.

मुंबई : गुजरात दंगलप्रकरणी  गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)  सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना मुंबईतून ताब्यात घेत कारवाई केली आहे. तसेच त्यांच्या संस्थेतील फंडिंगबाबतही एटीएस तपास करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दंगलीच्या कटाच्या आरोपातून मुक्त करणाऱ्या एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टला झाकिया यांनी आव्हान दिले होते. मोदींना सर्वोच्च न्यायालयाकडून क्लीन चिटही मिळाली आहे. २००६ मध्ये झाकियाने  मोदींविरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी अर्ज केला होता. २००७ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने तो न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठविला. दुसरीकडे, २००८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दंगलीशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी माजी सीबीआय संचालक आरके राघवन यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली. तिस्ता सेटलवाड यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला होता.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी न्यायालयाचा निकाल अतिशय काळजीपूर्वक वाचला आहे. निकालात तिस्ता सेटलवाड हिच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख आहे. तिस्ता सेटलवाड हिने पोलिसांना दंगलीबाबत निराधार आणि खोटी माहिती दिली होती, असेही शहा यांनी यावेळी वृत्तसंस्थेला सांगितले.

अहमदाबादमधील गुन्ह्याच्या चौकशीसाठी कारवाई -    गुजरात एटीएसचे पथक शनिवारी सांताक्रूझ पोलिसांच्या मदतीने सेटलवाड  यांच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील घरी पोहोचले. -    तिस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेऊन सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अहमदाबाद येथे नेण्यात आले. -    अहमदाबाद येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :GujaratगुजरातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी