गुजरात पोलीस दलात आता 33 टक्के महिला
By Admin | Updated: June 25, 2014 02:51 IST2014-06-25T02:51:52+5:302014-06-25T02:51:52+5:30
गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी राज्य पोलीस दलात महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची घोषणा केली़

गुजरात पोलीस दलात आता 33 टक्के महिला
>गांधीनगर : गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी राज्य पोलीस दलात महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची घोषणा केली़
गांधीनगरच्या करईस्थित गुजरात पोलीस अकादमीत 97 सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक आणि 39 गुप्तचर अधिका:यांच्या दीक्षांत समारंभात (पासिंग आऊट परेड) भाग घेतल्यानंतर आनंदीबेन पत्रकारांशी बोलत होत्या़ समाजात महिलांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना सक्षम बनविण्याची गरज आह़े यासाठी आमच्या सरकारने पोलीस भरतीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या़
संपूर्ण देशात गुजरातेत गुन्हय़ांचा दर सर्वाधिक कमी आह़े गुजरातेत गेल्या दहा वर्षात कुठलाही मोठा धार्मिक संघर्ष उद्भवला नाही़ शांतता आणि धार्मिक सौहार्दाचे वातावरण असल्यानेच गुजरात इतक्या वेगाने प्रगती करू शकला़ याचे श्रेय गुजरात पोलिसांनाही द्यायला हवे, असे गौरवोद्गार त्यांनी काढल़े (वृत्तसंस्था)