शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गुजरात पॅटर्न इतर राज्यांतही; आधी बदलला मुख्यमंत्री नंतर सर्व मंत्रीही हटविले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 5:54 AM

गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, गुजरातमधील हा फॉर्म्युला इतर राज्यांत वापरला जाऊ शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली / अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने १५६ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळविला. या यशामागे सरकारचा चेहरा-मोहरा बदलवून टाकणाऱ्या धाडसी फॉर्म्युल्याचा हात असल्याचे मानले जात असून इतर राज्यांतही भाजप हा फॉर्म्युला वारण्याची शक्यता आहे. 

गुजरात निवडणुकीच्या १४ महिने आधी भाजपने राज्यात मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. सप्टेंबर २०२१ मध्ये मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व २२ मंत्र्यांनाही हटविले होते. नंतर भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात सर्व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यात एकही वादग्रस्त, अथवा वाईट भूतकाळ असलेला नव्हता. उमेदवारी देतानाही असेच धाडस भाजपने दाखवले. गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, गुजरातमधील हा फॉर्म्युला इतर राज्यांत वापरला जाऊ शकतो.

ही चाल ठरली गेमचेंजर१८२ पैकी १०३ मतदारसंघांत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ५ मंत्र्यांसह ३८ आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली. या साहसी प्रयोगामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी धारणा (अँटी इनकम्बन्सी) तोडून ऐतिहासिक विजय मिळविणे शक्य झाले, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाउ शकते. 

गुजरात विधानसभेत एकच मुस्लिम आमदार१८२ सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधानसभेत काँग्रेसचे इम्रान खेडावाला हे एकमेव मुस्लिम आमदार ठरले आहेत. मावळत्या विधानसभेत ३ मुस्लिम आमदार होते. तिघेही काँग्रेसचेच होते. खेडावाला हे जमालपूर-खडिया मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. काँग्रेसने ६ मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. इतर ५ जण पराभूत झाले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळाnपुढील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि कर्नाटक या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांत ऐतिहासिक बदलांचा फॉर्म्युला कसा वापरता येईल, यावर भाजप नेतृत्व विचार करीत आहे. nमध्य प्रदेशात मजबूत प्रस्थापितविरोध आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला १०९ तर काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. नंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी २२ आमदारांसह बंड केल्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत आली. nतेथे हा फॉर्म्युला वापरता येऊ शकतो. तसेच राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022