गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पडलिया गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे शनिवारी दुपारी सर्व्हे करण्यासाठी आलेले वन आणि महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलिसांवर सुमारे ५०० जणांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात ४७ अधिकारी जखमी झाले.
या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या अधिकाऱ्यांपैकी ३६ जणांना उपचारांसाठी अंबाजी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर ११ अधिकाऱ्यांना पुढील उपचारांसाठी पालनपूर सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, जमावाने हा हल्ला का केला, याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी दुपारी सुमारे २.३०च्या दरम्यान पोलीस, वनविभाग आणि महसूल विभागाची संयुक्त टीम वनविभागाच्या सर्व्हे क्रमांक ९ क्षेत्रामध्ये नर्सरी आणि वृक्षारोपणाचं काम करत असताना घडली. काम सुरू असताना सुमारे ५०० लोकांच्या जमावाने दगडफेक सुरू केली. तसेच धनुष्यबाणांचा वापरही हल्ला करण्यासाठी केला. हा परिसर दांता तालुक्यामध्ये आहे. तो अंबाजी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून सुमारे १४ किमी अंतरावर आहे.
Web Summary : A mob of 500 attacked a survey team of forest, revenue, and police officials in Gujarat's Banaskantha district, injuring 47. The attack occurred during nursery work in a forest area. Reason unknown.
Web Summary : गुजरात के बनासकांठा जिले में 500 लोगों की भीड़ ने वन, राजस्व और पुलिस अधिकारियों की एक सर्वेक्षण टीम पर हमला किया, जिसमें 47 घायल हो गए। हमला वन क्षेत्र में नर्सरी के काम के दौरान हुआ। कारण अज्ञात।