शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा 'सुपडा साफ', भाजपचा 'डंका'; PM मोदींनी म्हणाले, 'गुजरात से अटूट नाता'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 23:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढ्या मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच जनतेचेही आभार मानले आहेत.

भाजपने गुजरातमधील आपले गड आणखी मजबूत केले आहेत. तेथे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसचा पार 'सुपडा साफ झाला आहे'. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढ्या मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच जनतेचेही आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल, सोशल मीडिया प्लॅटपॉर्म X वरून पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "गुजरातचे भाजपसोबत असलेले नाते केवळ अतूटच नाही, तर ते सातत्याने घट्टही होत चालले आहे!' राज्यात झालेल्या पंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपला पूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी गुजरातच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. विकासाच्या राजकारणाचा हा आणखी एक मोठा विजय आहे. यामुळे आमच्या कर्मठ कार्यकर्त्यांना अधिक उर्जेने लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल. ज्यांच्या अथक परिश्रमाने आणि प्रयत्नांमुळे हा शानदार विजय मिळाला, त्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो."

गुजरातमधील पालिका निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा विजय - गुजरातमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. निवडणूक झालेल्या ६८ पालिकांपैकी ६० पालिकांमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर काँग्रेसला केवळ एका नगरपालिकेत विजय मिळवता आला आहे. आम आदमी पक्षाला एकाही पालिकेत विजय मिळालेला नाही. तर समाजवादी पार्टीने दोन पालिकांमध्ये विजय मिळवला आहे. तीन पालिकांमध्ये टाय झाली आहे. तर एका पालिकेत अपक्षांनी वर्चस्व राखले आहे. तर एका पालिकेमध्ये कुणालाही बहुमत मिळालेले नाही.

गेल्या वेळी गुजरातमध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपाने ६८ पैकी ५१ पालिकांमध्ये विजय मिळवला होता. या वेळी हा आकडा ६० पर्यंत पोहोचला आहे. एकूणच स्थानिक पालिकांमध्ये भाजपाने एकूण १४०३ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने २६०, समाजवादी पार्टीने ३४, आपने २८ आणि बसपाने १९ जागांवर विजय मिळवला आहे. तर १५१ जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातElectionनिवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेस