शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 18:23 IST

चक्क बनावट न्यायाधीश खोटे न्यायालय चालवून पैसे उकळत होता.

कधी बनावट आयपीएस अधिकारी तर कधी बनावट पोलीस... सोशल मीडियावर हास्यास्पद तितक्याच संतापजनक घटना व्हायरल होत असतात. गुजरातमधील अहमदाबाद येथून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली. इथे चक्क बनावट न्यायाधीश खोटे न्यायालय चालवून पैसे उकळत होता. विशेष बाब म्हणजे आरोपीने खोट्या खटल्यांमधून तब्बल १०० एकर सरकारी जमीन बळकावली. आरोपी खोटी कागदपत्रे तयार करत असे. त्याने स्वत:च कागदपत्रे तयार केली, न्यायालयासमोर ठेवली आणि सरकारी जमीन आपल्या नावे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. हा सर्व प्रकार समोर येताच एकच खळबळ माजली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

अहमदाबाद येथील या खोट्या न्यायाधीशाने वादग्रस्त जमिनीवर निर्णय देला. आरोपी वकील मॉरिस सॅमुअल ख्रिश्चियनने स्वत:ला न्यायाधीश घोषित करुन न्यायालयाचे कामकाज चालवले आणि सरकारी जमिनीवर खोटा आदेश जारी केला. मागील वर्षभरापासून गुजरातमधील अनेक खोटी प्रकरणे समोर येत आहेत. तक्रारदार हार्दिक देसाई यांनी खोट्या न्यायाधीशाचा पर्दाफाश करताना प्रशासनाच्या कारभावर प्रश्न उपस्थित केले. स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल करुन त्यांनी याविरोधात आवाज उठवला. 

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपी मॉरिसने २०१९ मध्ये वादग्रस्त जमिनीशी संबंधित प्रकरणावर मध्यस्थी करण्याचा आदेश दिला असल्याचे उघड झाले. याशिवाय आरोपी वासणा परिसरात एक खोटे न्यायालय चालवत होता, जिथे त्याने वकील, क्लर्क आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची भूमिका बजावली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १७०, ४१९, ४२०, ४६५, ४६७ आणि ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाहीतर मणिनगर पोलीस स्थानकात यापूर्वी देखील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातCourtन्यायालय