शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

गोध्रा प्रकरणात कायदा-सुव्यवस्था राखण्यात तत्कालीन गुजरात सरकार अपयशी, न्यायालयानं ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:07 IST

2002मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांड प्रकरणात कायदा-सुव्यवस्था राखण्यात तत्कालीन गुजरात सरकार अपयशी ठरल्याचे गुजरात उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत.

अहमदाबाद - 2002मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांड प्रकरणात कायदा-सुव्यवस्था राखण्यात तत्कालीन गुजरात सरकार अपयशी ठरल्याचे गुजरात उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. तर दुसरीकडे गुजरात उच्च न्यायालयानं 11 दोषींची फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर केलं आहे.तत्कालीन गुजरात सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही न्यायालयानं ठेवला आहे. 27 फेब्रुवारी 2002मधील गोध्रा कांडाचा आज निर्णय आला आहे. त्यावेळी साबरमती ट्रेनमध्ये आग लावण्यात आली होती. या दुर्घटनेत 59 लोकांचा मृत्यू झाला होता. या ट्रेनच्या डब्यातून अयोध्याहून परतणारे प्रवासी बहुतांश कारसेवक होते. या प्रकरणात एसआयटीच्या विशेष न्यायालयानं 31 आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती.एसआयटीनं या प्रकरणात 63 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. एसआयटीच्या निर्णयाला न्यायालयानं आरोपींच्या वकिलांनी आव्हान दिलं होतं. तसेच गुजरात सरकारनं 63 आरोपींची निर्दोष सुटका करण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना आज न्यायालयानं त्या 11 दोषींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर केलं आहे. गुजरात दंगलीवरून अनेकदा भाजपाला लक्ष्य करण्यात आलं आहे. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर गोध्रा प्रकरणावरून अनेकदा टीका करण्यात येते.विशेष म्हणजे तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही मोदींना राजधर्माचं पालन करण्याचा सल्ला दिला होता. काँग्रेस आणि विरोधी पक्ष गुजरात दंगलीवरून नेहमीच नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. गुजरात उच्च न्यायालयानं गोध्रा हत्याकांडातील पीडितांना 10 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. न्यायालयानं 6 आठवड्यांच्या आत भरपाई देण्याचे आदेश गुजरात सरकारला दिले आहेत. 

टॅग्स :Gujarat Riots 2002गुजरात दंगल 2002GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदी