शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे 'मिशन इलेक्शन' जोरात; गुजरातमध्ये CNG सात रुपयांनी स्वस्त, PNG दरातही कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 17:17 IST

Gujarat Government : पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत ग्राहकांना 6 ते 7 रुपये किलोचा फायदा मिळणार आहे.

गुजरात निवडणुकीपूर्वी भूपेंद्र पटेल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गुजरात सरकारने राज्यातील सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) किमती कमी करण्यासाठी 10 टक्के व्हॅट (VAT) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा 14 लाख सीएनजी वाहन चालकांना होणार आहे. याशिवाय, पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत ग्राहकांना 6 ते 7 रुपये किलोचा फायदा मिळणार आहे.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 2 सिलिंडर मोफतदेशात सतत वाढत असलेल्या गॅसच्या किमतींमध्ये गुजरात सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय, भूपेंद्र पटेल सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 2 सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आयुष्मान कार्डचे वितरणगुजरातमध्ये वर्षअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी भाजपा सरकारने जनतेला खूश करण्यासाठी अनेक गिफ्ट्स दिले आहे. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - मुख्यमंत्री अमृतम आयुष्मान कार्डचे वितरण देखील सुरू करतील. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ही माहिती दिली. या योजनेमुळे राज्यातील आर्थिक दुर्बल रुग्णांना मोठी भेट मिळणार असून, त्यांना उपचाराच्या अनेक सुविधा मिळणार आहेत.

निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीविशेष म्हणजे गुजरातमधील सर्व राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसशिवाय आम आदमी पक्षही जोरदारपणे लढणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून ते सर्व पक्षाचे नेते सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व बडे नेते सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत.

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाElectionनिवडणूक