गुजरातमध्ये मुलींना पोहून शाळेत जावे लागते
By Admin | Updated: August 5, 2014 16:52 IST2014-08-05T16:52:47+5:302014-08-05T16:52:47+5:30
गुजरातमधील विकास मॉडेलचे दाखले देणा-या नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना चक्क पोहून शाळेत जावे लागत आहे

गुजरातमध्ये मुलींना पोहून शाळेत जावे लागते
ऑनलाइन टीम
अहमदाबाद, दि. ५ - गुजरातमधील विकास मॉडेलचे दाखले देणा-या नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना चक्क पोहून शाळेत जावे लागत आहे. गावातील नदीवर पुल बांधण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापूर्वी दररोज पोहण्याची परीक्षा द्यावी लागत आहे. मध्य गुजरातमधील आदिवासी विभागातील १०० विद्यार्थांना पोहून शाळेत जावे लागते. यामध्ये ३० मुलींचाही सहभागह आहे. शाळेचा गणवेश घालून आपले दप्तर एका हंड्यात ठेवून एक दोन नव्हे तर तब्बल सहा किलोमिटर त्यांना पोहून जावे लागते. अर्थातच येतानाही तोच रस्ता असतो. आपल्यासाठी हे अंतर सहा किलोमिटर अतकं असलंतरी या मुलांसाठी हा शॉर्टकट आहे. रस्त्याने शाळेत जायचे झाल्यास २० किलोमिटर इतकं अंतर कापावं लागतं. नदीच्या पैलतिरावर एका व्यक्तीला मुलं निट येताहेत की नाही हे पाहण्याचे काम देण्यात आले आहे.
मध्यगुजरातच्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची ही दैनंदीनी आहे. ही समस्या गावक-यांनी २००९ साली मोदींच्या कानावर घातली होती. परंतू २०१४ मध्येही इथल्या लोकांचे अजून अच्छेदिन आलेले नाहीत.
तसेच जिल्ह्यातील प्रशासकीय अधिका-यांना या प्रकरणी विचारले असता त्यांनी सरकार या प्रकरणी लवकरच तोडगा काढणार असून त्यातकरता १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुलांना सायकल बाईक आणि मिनी बसची सुविधा उपलबध करून दण्यात येणार असल्याचे सरकारी ठेवणीतील उत्तर अधिकारी देत आहेत. या प्रकरणी सराकरदरबारी टाचा झिजवूनही काही फयदा झाला नाही. असं हतबलपणे इथले सरपंच सांगतात.