शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तिच बाप अन् तिच माय; आधी स्वत:चं सीमन फ्रिज केलं; आता लिंगबदल करून आई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 11:37 IST

तिचा तो होणार; वर्षाच्या अखेरीस लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुष महिला होणार

अहमदाबाद: मूल जन्माला येण्यासाठी दोन व्यक्ती लागतात. एक महिला आणि एक पुरुष यांच्या माध्यमातून मूल जन्माला येतं. पण गुजरातमध्ये राहणाऱ्या डॉ. जेसनूर दायरा दोन्ही भूमिका पार पाडणार आहेत. त्यांनी स्वत:चं सीमन फ्रिज केलं आहे. आता लिंगबदल शस्त्रक्रिया करून गर्भधारणा करण्याचा दायरा यांचा विचार आहे. तशी तयारी त्यांनी सुरू केली आहे.गुजरातच्या डॉ. जेसनूर दायरा ट्रान्स वूमन आहेत. म्हणजे त्यांचा जन्म पुरुष म्हणून झाला. पण त्या स्वत:ला महिला मानतात. त्या लवकरच लिंगबदल शस्त्रक्रिया करणार आहेत. मात्र त्याआधी त्यांनी त्यांचे सीमन फ्रिज करून सुरक्षित ठेवले आहेत. लिंगबदल शस्त्रक्रिया झाल्यानंतर याच सीमनच्या माध्यमातून आई होण्याचा त्यांचा विचार आहे.बाबो! ४ महिन्यांच्या या गायीला मिळाली २ कोटी रूपये किंमत, पण का?डॉ. दायरा यांनी नुकतीच रशियातील विद्यापीठातून एमबीबीएस पदवी घेतली. त्या गुजरातमधील पहिल्या ट्रान्स वूमन डॉक्टर आहेत. त्यांचा जन्म गोध्र्यात झाला आहे. शरीरानं पुरुष असल्या तरी मनानं स्त्री असल्याची जाणीव दायरा यांना लहानपणीच झाली. मात्र त्यांनी ही गोष्ट कधीही त्यांच्या कुटुंबाला सांगितली नाही. कुटुंबीयांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी शांत राहणं पसंत केलं.कौतुकास्पद! दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मराठमोळ्या तरूणानं यशस्वी सर केला लिंगाणा किल्लादायरा परदेशात असताना त्यांनी स्वत:ची ओळख आणि भावना सर्वांपुढे ठेवण्याचं धाडस केलं. 'मी स्वत:मधलं खरं रुप ओळखलं आणि एका महिलेप्रमाणे राहण्याचं धाडस केलं. ही गोष्ट स्वतंत्र होण्यासारखी होती,' असं दायरा यांनी सांगितलं. आता दायरा यांना थांबायचं नाहीए. त्यांना स्वत:च्या अटी-शर्तींनुसार आयुष्य जगायचं आहे. यासाठी त्यांना कुटुंबाचा आणि समाजाचाही पाठिंबा मिळत आहे.वर्षाच्या अखेरीस लिंग बदल शस्त्रक्रियाया वर्षाच्या अखेरीस दायरा लिंगबदल शस्त्रक्रिया करून महिला होतील. त्यामुळे त्यांचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. जैविकदृष्ट्या हे मूल त्यांचं असेल. कारण वडिल म्हणून त्यांच्या सीमनच्या माध्यमातून मूल जन्माला येईल. सरोगसीच्या माध्यमातून मुलाचा जन्म होईल. यानंतर दायरा मुलाचा सांभाळ करतील.