कौतुकास्पद! दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मराठमोळ्या तरूणानं यशस्वी सर केला लिंगाणा किल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 06:59 PM2021-02-16T18:59:08+5:302021-02-16T19:03:13+5:30

Inspirational Stories : विशेष म्हणजे काठ्यांचा आधार घेतल्याशिवाय चैतन्यला उभंही राहता येत नाही तरी यानं ही कामगिरी केल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Successful climb of lingana fort by a young man with both legs disabled chaitanya kulkarni ahmadnagar | कौतुकास्पद! दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मराठमोळ्या तरूणानं यशस्वी सर केला लिंगाणा किल्ला

कौतुकास्पद! दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मराठमोळ्या तरूणानं यशस्वी सर केला लिंगाणा किल्ला

Next

लिंगाणा डोंगराची चढाई करणं खूपच कठीण आहे. या डोंगराची चढाई करणं धडधाकड लोकांनाही जमत नाही. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अहमनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील दाढ गावातील रहिवासी असलेल्या चैतन्य कुलकर्णी नावाच्या एका अपंग  तरूणाने या दुर्गम डोंगरी किल्ल्यावर यशस्वीरित्या चढाई केली आहे. विशेष म्हणजे काठ्यांचा आधार घेतल्याशिवाय चैतन्यला उभंही राहता येत नाही तरी यानं ही कामगिरी केल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

२०१४ ला चैतन्य  ६० फूड नारळाच्या झाडावरून खाली पडला होता. त्यामुळे त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यानंतर त्याला नेहमी चालण्यासाठी काठ्याची गरज भासू लागली. इच्छाशक्ती असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे चैतन्यने वारंवार सिद्ध केलं आहे. अशा स्थितीतही त्यानं खडतर रस्ता पार करत शक्तीच्या जोरावर महाराष्ट्रातील सर्वोच्च  कळसूबाई शिखर तीन वेळा सर केलं आहे. 

माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचार

कंबरेखालचा भाग निष्क्रीय झाल्यानं सुळक्यावर चढाई करण्यात अनेक अडचणी येत होत्या. असं असताना त्याने लिंगाणा डोंगरावरील शिखरावरची गुहा गाठत भारताचा तिरंगा ध्वज फडकवत विक्रम केला आहे. लिंगाणा ट्रेक करण्यासाठी चैतन्य महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या ग्रुप लीडर एडवेंचर्सची भेट  घेत होता. पण पायाची अवस्था पाहून त्याला कोणीही  प्रतिसाद देत नव्हतं. पण  बारामतीतील अनिल वाघ, अमोल बोरकर आणि संदीप कसबे यांच्या ग्रुपने चैतन्याला ही संधी दिली. ज्याचं चैतन्यनं सोनं केलं आहे. त्याने सह्याद्री पर्वतरांगेतील अवघड असलेला लिंगाणा गड सर करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी सुरूवात केली होती.  त्याने एक दिवस अवघड चढाई करून मध्ये एकदा थांबले होते.

माणुसकीला काळीमा! आधी मुक्या जीवाला दांड्यानं मारलं नंतर रस्त्यावरून नेलं फरपटत, व्हायरल फोटो 

त्यानंतर १३ तारखेला दुसऱ्या दिवशी पुन्हा गडाची अवघड चढाई सुरू केल्यानंतर फक्त ५ तासात लिंगाणा शिखराची गुहा सर करण्यात यश मिळवलं आहे. त्यानंतर उन्हाच्या तडाख्यामुळे चैतन्याला पुढील ट्रेक करणं अशक्य वाटत होतं. त्यामुळे चैतन्याने गुहा सर केल्यानंतर तिरंगा झेंडा फडकावून उत्सव साजरा केला. त्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. चैतन्याचं ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.
 

Web Title: Successful climb of lingana fort by a young man with both legs disabled chaitanya kulkarni ahmadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.