शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणूक: पाहता क्षणी मॉडेल वाटणा-या श्वेता ब्रह्मभट्टचा 75 हजार मतांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 13:24 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना सगळयांचेच लक्ष मणिनगरच्या निकालाकडे लागले होते.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना सगळयांचेच लक्ष मणिनगरच्या निकालाकडे लागले होते. मणिगनरमधून भाजपाचे सुरेश पटेल विजयी झाले असून त्यांनी काँग्रेस उमेदवार श्वेता ब्रह्मभट्टचा  75,199 मतांनी पराभव केला. मागच्यावेळी सुरेश पटेल इथून 87 हजार मतांनी जिंकले होते. दोन कारणांमुळे मणिनगरच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते.  मणिनगर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 2014 साली लोकसभेवर जाण्यापूर्वी मोदी तीनवेळा याच मतदारसंघातून निवडून विधानसभेवर गेले होते.

काँग्रेसने यावेळी मणिनगरमधून श्वेता ब्रह्मभट्टचा उमेदवारी दिल्याने हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला होता. श्वेता ब्रह्मभट्टचा सौंदर्यामुळे माध्यमांनी तिला भरपूर प्रसिद्धी दिली. श्वेताचा फोटो किंवा तिला पाहिल्यानंतर ती मॉडेल असल्याचा अनेकांचा समज होतो. उच्चशिक्षित असलेल्या श्वेताने इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले आहे. श्वेताला मणीनगरमधून उमेदवारी जाहीर झाली. तिच्या उमेदवारीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्वेताला तिकिट दिले म्हणून आंदोलनही केले होते.

श्वेताला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायचे होते. बीबीएमध्ये पदवी घेतल्यानंतर तिने लंडनच्या  विद्यापीठातून मास्टर्सची पदवी घेतली. त्यानंतर एचएसबीसी आणि डाराशॉमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले. त्यानंतर समाजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्र असे दोन पर्याय समोर असताना तिने समाजकारणाची निवड केली. 2012 मध्ये श्वेताला विधानसभा निवडणूक लढवायची संधी होती पण करीयर महत्वाचे असल्याने तिने ऑफर नाकारली.  1990 पासून मणिनगर भाजपाचा गड असून इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्य मुख्यालय आहे. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017