शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Gujarat Elections 2022: "RSS मधूनच जन्माला आलं AAP, भाजप-आपची भांडणं म्हणजे नुसता दिखावा"; काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 18:08 IST

ओवेसींच्या एमआयएमवरही डागली तोफ

Gujarat Elections 2022, RSS AAP and BJP: गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, मात्र राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपा आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते सतत रॅली आणि सभा घेत आहेत. काँग्रेसनेहीआपला प्रचार सुरू ठेवला आहे. काँग्रेसचे बडे नेते गुजरातमध्ये क्वचितच जाताना दिसतात. पण याच दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बुधवारी हैदराबादमध्ये बोलताना गुजरातच्या निवडणुकांचा मुद्दा मांडला. आम आदमी पार्टी (AAP) हा वेगळा पक्ष नाही, तो भाजपचाच मित्रपक्षच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) ची फ्रंट ऑर्गनायझेशन असलेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेतून २०१२ मध्ये त्यांचा जन्म झाला, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

"भाजपा आणि आम आदमी पक्षाचे मुद्दे आणि भाषा जवळपास सारखीच आहे. दोघेही कधी एकमेकांविरुद्ध बोलले तर तो केवळ दिखाव्यासाठी राजकीय हल्ला असतो. आम आदमी पार्टी मीडियामध्ये भरपूर जाहिराती देत ​​आहे, मीडियामध्ये आपच्या जाहिराती भरलेल्या आहेत. पण वास्तविकता काही औरच आहे. गुजरातमध्ये खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. आम आदमी पार्टी काँग्रेसची मते कमी करण्यासाठी आणि भाजपाला मदत करण्यासाठीच आपले उमेदवार उभे करत आहे," असा दावा जयराम रमेश यांनी केला.

ओवेसींच्या 'एमआयएम'वरही केला हल्लाबोल

जयराम रमेश यांनी असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM)बाबतही रोखठोक भूमिका मांडली. ओवेसींचा पक्ष भाजपसाठी काम करतो. एमआयएम म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून भाजपची बी-टीम आहे. भाजपाकडून त्यांना सर्व प्रकारची मदत मिळते आणि त्यावर त्यांची संघटना मजबूत केली जाते, असा आरोप त्यांनी केला. भारत जोडो यात्रेत काँग्रेस पक्षाला ज्या प्रकारे जनसमर्थन मिळत आहे, त्यावरून जनतेची काँग्रेस पक्षाप्रती असलेली ओढ सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर राज्यस्तरीय वैयक्तिक दौरे काढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आसाम आणि ओडिशा पासून सुरुवात करून त्यानंतर ते पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्येही अशा रॅली काढल्या जाणार आहेत. त्यातून विरोधकांसंबंधी माहिती देऊन जनजागृती केली जाईल," असा इशाराच त्यांनी दिला.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाAAPआपRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन