शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election Result 2022: एकेकाळी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले; त्याच गुजरातमध्ये आपने... मैलाचा दगड ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:32 IST

Gujarat Election Result 2022: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आप राष्ट्रीय पक्ष बनल्याचे म्हटले आहे.

गुजरातची निवडणूक आपला एक मोठे यश मिळवून देणारी ठरणार आहे. काल दिल्ली महापालिकेत विजय मिळविल्यानंतर आजच आपसाठी गुजरात निवडणूक महत्वाची होती. गेल्या निवडणुकीला आपने गुजरातमध्ये ३६ उमेदवार रिंगणात उतरविले होते. परंतू, या सर्वांची डिपॉझिट जप्त झाली होती. परंतू, यावेळच्या निवडणुकीत आपने भाजपाची झोप उडविली आहे. 

गुजरातमध्ये आपला अद्यापपर्यंत झालेल्या मतमोजणीत १४ टक्के मतदान झाल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाला ५३.४ टक्के मतदान झाले आहे. तर आपला १३.५१ टक्के मतदान झाले आहे. काँग्रेसला २६.६२ टक्के मतदान झाले आहे. 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आप राष्ट्रीय पक्ष बनल्याचे म्हटले आहे. गुजरातच्या जनतेच्या मतांमुळे आम आदमी पार्टी आज राष्ट्रीय पार्टी बनत आहे. शिक्षण आणि आरोग्याच्या राजकारणात पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात ओळख बनू लागली आहे. यासाठी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे. आपची दिल्लीत दुसऱ्यांदा सत्ता आली आहे. पंजाबमध्येही आप सत्तेत आली आहे. गोव्यात दोन आमदार आहेत. असे असताना गुजरातमध्ये आज जर आपचे आमदार निवडून आले तर चार राज्यांत आपचे अस्तित्व निर्माण होणार आहे. यानंतर आप कर्नाटकात निवडणूक लढविणार आहे. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022AAPआपBJPभाजपा