शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election Result 2022: नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना भाजपने रचला होता इतिहास, यावेळी मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 13:29 IST

Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 150 हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे.

Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 150 हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. भाजपच्या एवढ्या मोठ्या विजयाने राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही भाजपला एवढा मोठा विजय नोंदवता आला नव्हता.

नरेंद्र मोदींनी केला होता विक्रम 2001 मध्ये अंतर्गत उलथापालथीनंतर भाजपने नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री केले होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्याच वर्षी 2002 मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपने 127 जागा जिंकल्या होत्या. 1990 नंतर पक्षाचा हा सर्वात मोठा विजय होता. 1998 मध्ये भाजपला 117 जागा मिळाल्या होत्या.

गुजरात मॉडेलच्या नावावर जिंकले, पण...नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपने गुजरात मॉडेलचा जोमाने प्रचार केला. 2007 आणि 2012 च्या निवडणुकीत पक्ष गुजराती अस्मिता आणि गुजरात मॉडेलचा प्रचार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरला. दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाचा विजय झाला, पण पूर्वीच्या तुलनेत जागांची संख्या कमी झाली. 2007 मध्ये भाजपने 117 जागा जिंकल्या होत्या तर 2012 मध्ये 115 जागा जिंकल्या होत्या. 2012 च्या निवडणुका जिंकल्यानंतर मोदींनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.

2017 मध्येही मोदींच्या चेहऱ्याला 100 विजय2017 च्या निवडणुकीपूर्वीच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले होते. पण, राज्यात भाजपने नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली होती. मोदींच्या नावावर निवडणूक लढवल्याचा फायदा भाजपला निश्चितच झाला आणि सत्ताविरोध असतानाही सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश आले. मात्र, यावेळी जागांची संख्या 100 चा आकडाही गाठू शकली नाही. 182 विधानसभा असलेल्या गुजरातमध्ये भाजपचे केवळ 99 आमदार जिंकू शकले.

पहिल्यांदाच मतांची विक्रमी टक्केवारीगुजरातमध्ये बंपर विजयाकडे वाटचाल करणाऱ्या भाजपच्या मतांच्या टक्केवारीतही वाढ होताना दिसत आहे. पक्षाला यावेळी जवळपास 53 टक्के मते मिळताना दिसत आहेत. 2002 च्या निवडणुकीत भाजपला 49.85%, 2007 मध्ये 49.12% आणि 2012 मध्ये 47.85% मते मिळाली होती.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी