शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election: मोठी बातमी! गुजरातच्या माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 8 मंत्र्यांचा निवडणूक लढवण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 21:07 IST

Gujarat Election: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पक्षाला नकार कळवला आहे.

Gujarat Election: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि भूपेंद्र सिंह चुडासामा आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांना पत्र लिहून निवडणूक न लढवण्याची विनंती केली आहे. या सर्वांनी आपला निर्णय पक्षनेतृत्वालाही कळवला आहे. दुसरीकडे, विजय रुपाणी सरकारमध्ये मंत्री राहिलेले सौरभ पटेल आणि प्रदीप सिंह जडेजा यांचीही निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. आतापर्यंत एकूण आठ माजी मंत्र्यांनी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सौरभ पटेल हे अंबानी कुटुंबाचे जावई आहेत. नरेंद्र मोदी सरकार आणि विजय रुपाणी सरकारमध्ये ते ऊर्जामंत्रीही राहिले आहेत. यावेळी ते निवडणूक लढवणार नाहीत. गुजरातमधील नरेंद्र मोदी, आनंदीबेन पटेल आणि विजय रुपाणी सरकारमधील कोणता मंत्री निवडणूक लढवणार याबाबत साशंकता कायम आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे.नवीन लोकांना संधी द्यावी : रुपाणीगुजरातमध्ये 27 वर्षांपासून सत्तेत असलेला भाजप यावेळीही पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. भाजपचे बडे नेते गुजरातच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरून जोरदार प्रचारात गुंतले आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, निवडणुकीत नव्या लोकांना, कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. मी निवडणूक लढवणार नाही. तसे पत्र दिल्लीला पाठवले आहे. केंद्रीय निवडणूक समिती जे काही उमेदवार निवडेल, त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न करेल.

हे मंत्री निवडणूक लढवणार नाहीतराजकोट पश्चिम - विजय रूपाणी - मुख्यमंत्री मेहसाणा- नितीन पटेल - उपमुख्यमंत्रीवटवा - प्रदीप सिंह जडेजा - गृह मंत्रीढोलका- भूपेंद्रसिंह चुडासमा- शिक्षण मंत्रीबोटाद- सौरभ पटेल- ऊर्जा मंत्रीभावनगर - विभावरी दावे - महिला आणि बालविकास मंत्री अहमदाबाद, ठक्कर बापानगर  - वल्लभ काकडिया - ट्रांसपोर्ट मंत्री जामनगर, कालावाड - आर सी फलदू - कृषी मंत्री 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाVijay Rupaniविजय रूपाणी