शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीवरून रवींद्र जडेजाच्या कुटुंबात वादळ, पत्नी-बहीण आमनेसामने? काँग्रेस घेणार फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 11:37 IST

Gujarat Assembly Election 2022: गुजरात निवडणुकीसाठी भाजपाने जामनगर येथून क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीनंतर रवींद्र जडेजाच्या कुटुंबात राजकीय वादळ आले आहे.

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपाने जामनगर येथून क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीनंतर रवींद्र जडेजाच्या कुटुंबात राजकीय वादळ आले असून, रिवाबाविरुद्ध रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा ही काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण नयनाबा हिला काँग्रेसने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र ती पक्षासाठी जोरदार प्रचार करत आहे.

जामनगर येथील जागेबाबत नयनाबा म्हणाली होती की, ‘’मला वाटते जर भाजपाने येथे कुठला नवा चेहरा आणला तर विधानसभेतील ७८ क्रमांकाचा मतदारसंघ काँग्रेस जिंकू शकेल. कारण नव्या चेहऱ्याकडे अनुभवाची कमतरता असेल. तसेच राजकीय ज्ञानही कमी असेल. केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही. मला वाटते जर भाजपाने नवा चेहरा आणला तर काँग्रेस ही जागा जिंकेल’’. गुजरात विधानसभेतील ७८ क्रमांकाचा मतदारसंघ हा जामनगर उत्तर हा आहे. या मतदारसंघात भाजपाने रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला उमेदवारी दिली आहे. 

गेल्या काही  महिन्यांपासून रिवाबा गुजरातच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय होती. तेव्हापासूनच येथे भाजपा रिवाबाला उमेदवारी देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दुसरीकडे रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. एकीकडे रिवाबा हिला रवींद्र जडेजाकडून पाठिंबा मिळतो. तर दुसरीकडे बहिणीला जडेजाचे वडील अनिरुधसिंह यांचा पाठिंबा आहे.

दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये असलेल्या नणंद आणि भावजयीमध्ये नेहमी राजकारणावरून वादविवाद होत असतात. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मास्कवरून दोघी जणी आमने-सामने आल्या होत्या. त्यावेळी रिवाबा हिच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यावेळी तिने मास्क व्यवस्थित लावला नव्हता. त्यावरून नयनाबा हिने रिवाबावर टीका केली होती.  

टॅग्स :ravindra jadejaरवींद्र जडेजाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Familyपरिवार