शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election 2022: गुजरातमधील प्रचारसभेत राहुल गांधींचे भाषण एका व्यक्तीने अचानक रोखले, त्यानंतर घडले असे काही... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 08:56 IST

Rahul Gandhi : सोमवारी राहुल गांधी गुजरातमधील एका प्रचारसभेत भाषण देत असताना त्यांना एका व्यक्तीने अचानक रोखले. त्यामुळे सारेच अवाक झाले.

अहमदाबाद -  डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधीही भारत जोडो यात्रेमधून वेळ काढत गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पोहोचले आहेत. दरम्यान, सोमवारी राहुल गांधी गुजरातमधील एका प्रचारसभेत भाषण देत असताना त्यांना एका व्यक्तीने अचानक रोखले. त्यामुळे सारेच अवाक झाले. त्याचे झाले असे की, राहुल गांधी हिंदीमध्ये भाषण देत होते. तर त्या भाषणाचा गुजराती अनुवाद भरतसिंह सोलंकी करत होते. त्यावेळी या व्यक्तीने भाषण थांबवून राहुल गांधी यांना हिंदीतूनच भाषण सुरू ठेवण्याचा आग्रह धरला. तसेच आम्ही समजून घेऊ गुजराती अनुवादाची गरज नाही, असे सांगितले.

राहुल गांधी भाषण करत असताना ही व्यक्ती उभी राहिली आणि म्हणाली. तुम्ही हिंदीतच बोला. आम्ही समजून घेऊ, आम्हाला अनुवादकाची गरज नाही. त्यानंतर राहुल गांधी थांबले आणि त्यांनी मंचावरील नेत्यांना विचारले की हे योग्य ठरेल का. तेव्हा उपस्थित जनतेनेही त्यांना पाठिंबा दिला आणि भाषणामध्ये अनुवादकाची गरज उरली नाही.

सध्या भारत जोडो यात्रेवर निघालेल्या राहुल गांधी यांची गुजरात निवडणुकीतील ही पहिलीच सभा होती. ते सुरत जिल्ह्यातील महुवा येथे उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आदिवासी हे देशाचे पहिले मालक असल्याचे सांगत भाजपा त्यांचे हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप केला. भाजपावाले आदिवासींना वनवासी म्हणतात. तुम्ही भारताचे पहिले मालक आहात हे सांगत नाहीत. तुम्ही शहरात राहावं असं त्यांना वाटत नाही. तुमची मुलं शिकून डॉक्टर, इंजिनियर बनावतीत, इंग्रजी शिकावीत असं भाजपाला वाटत नाही.

यावेळी आर्थिक धोरणांवरूनही राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले की, सध्याच्या सरकारने देशामध्ये दोन राष्ट्रे तयार केली आहेत. एकीकडे अतिश्रीमंत लोक आहेत. ते काहीही स्वप्नं पाहू शकतात आणि ती पूर्ण करू शकतात. बंदरांपासून विमानतळांपर्यंत खरेदी करू शकतात. दुसरीकडे देशात गरीब आणि मध्यमवर्ग आहे. त्याला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. जे गरिबीतून बाहेर पडले आहेत. त्यांना पुन्हा गरिबीच्या गर्तेत ढकलण्यात आले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022congressकाँग्रेस