शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election 2022: क्रिकेटपटू रवींद्र जडेजा पत्नीला जिंकवण्यासाठी, त्याची बहीण वहिनीची विकेट घेण्यासाठी मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 10:17 IST

Gujarat Election 2022: जामनगर उत्तर या मतदारसंघात भाजपने भारतीय क्रिकेट खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्या रुपात हायप्रोफाइल युवा चेहरा दिला आहे.

- कमलेश वानखेडेजामनगर : जामनगर उत्तर या मतदारसंघात भाजपने भारतीय क्रिकेट खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्या रुपात हायप्रोफाइल युवा चेहरा दिला आहे. पत्नीला जिंकवण्यासाठी रवींद्र जडेजा मैदानात उतरला असून, तो सभा, रोड शोमधून प्रचार करीत आहे, तर जडेजा यांची बहीण नयना या महिला काँग्रेसच्या पदाधिकारी असून, वहिनीची विकेट घेण्यासाठी दररोज नवनवीन आरोपांची गुगली टाकत आहेत. या हायप्रोफाइल सीटवर नणंद -  भावजयीमध्ये सुरू असलेली ठसन खूप गाजत असून, अख्ख्या गुजरातचे याकडे लक्ष लागले आहे.

भाजपचे उपमहापौर ‘आप’कडून मैदानात भाजपचे माजी उपमहापौर करसम करमूर हे आपकडून रिंगणात उतरले आहेत. करमूर हे आहीर समाजाचे असून, या समाजाचेही मतदारसंघात मोठेे प्राबल्य आहे. ते भाजपचे काहीअंशी नुकसान करतील, असा दावाही अनेक मतदार करीत आहेत.

रिवाबाची नणंद नयना म्हणते ‘हात’ नहीं छोडुंगी!nकाँग्रेसने राजपूत असलेले दीपेंद्रसिंह जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. ते व्यापारी असून, चेंबर ऑफ कॉमर्सचे महामंत्री आहेत. त्यांच्या प्रचारात जडेजाची बहीण नयना आघाडीवर आहे. nनयना यांनीही काँग्रेसकडे तिकीट मागितले होते; पण ते मिळाले नसले तरी त्या वहिनी रिवाबांच्या विरोधात गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा घालून आक्रमकपणे प्रचार करीत आहेत.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022ravindra jadejaरवींद्र जडेजाFamilyपरिवार