शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: भय इथले संपत नाही! फूटावर फूटावर २५ चिता जळताहेत; अंत्यविधींना स्मशानं कमी पडताहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 10:27 IST

CoronaVirus News: स्मशानभूमीतील शवदाहिन्या २४ तास सुरू; तरीही स्मशानाबाहेर अनेक मृतांचे नातेवाईक वेटिंगवर

अहमदाबाद: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग चिंता वाढवणारा असून गेल्या १० दिवसांपासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहे. १० दिवसांपूर्वी देशात पहिल्यांदा २४ तासांत १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर आज देशात २ लाख रुग्ण आढळून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगानं पसरत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था व्हेटिंलेटरवर असल्याचं चित्र आहे. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत आणि स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नाही, अशी भीषण दृश्यं सध्या दिसू लागली आहेत. (gujarat coronavirus scary situation long wait at crematoriums after surge in corona deaths)कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यावर किती वेळात होते लागण?; वाचून धक्का बसेलमहाराष्ट्र, दिल्ली पाठोपाठ आता गुजरातमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक स्मशानांबाहेर मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अहमदाबाद, सूरत सारख्या प्रमुख शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू धर्मात साधारणपणे सूर्योदयानंतर अंत्यविधी करत नाहीत. मात्र कोरोना मृतांचा आकडा वाढतच असल्यानं अनेक ठिकाणी रात्रीदेखील अंत्यस्कार सुरू आहेत. त्यामुळे शवदाहिन्या अक्षरश: २४ तास सुरू आहेत. हृदयद्रावक! पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्यू, धक्क्याने महिलेनेही सोडला जीव; एकाच घरात 4 दिवसांत 3 अंत्ययात्रासूरत शहरातल्या उमरा भागात एका स्मशानात दोन दिवसांपूर्वी एकाचवेळी २५ जणांना अग्नी देण्यात आला. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बडोद्यातही रात्रीच्या वेळी मृतदेहांवर अंत्यविधी होत आहेत. गुजरातच्या प्रमुख शहरांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि मृतांच्या नातेवाईकांना फार वेळ प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी अधिकाऱ्यांनी लोखंडाच्या चिता तयार केल्या आहेत.गुजरातच्या महत्त्वाच्या शहरांमधील काही स्मशानं अनेक महिन्यांपासून बंद होती. मात्र आता ती स्मशानं सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अहमदाबादमधल्या काही मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी तब्बल ८ तास वाट पाहावी लागली. शहरात वाडाज आणि दुधेश्वर या दोन प्रमुख स्मशानभूमी आहे. या दोन्ही स्मशानांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या