शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फळाचं बारसं! गुजरात सरकारने बदललं ड्रॅगन फ्रूटचं नाव, मुख्यमंत्र्यांनी केली "या" नव्या नावाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 10:34 IST

Gujarat CM Vijay Rupani Renames Dragon Fruit : गुजरातमध्ये थेट फळाचं नाव बदलण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - एखाद्या चौकाचं, ठिकाणाचं अथवा शहराचं नाव बदलण्यासाठी सरकार आणि नेतेमंडळी आग्रही असतात. त्यामुळेच ते अनेकदा चर्चेत देखील असतात. गेल्या काही दिवसांपासून शहरांच्या नामांतराची चर्चा सुरू आहे. याच दरम्यान आता शहरांवरून हा मोर्चा फळांकडे वळवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये थेट फळाचं नाव बदलण्यात आलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये आता ड्रॅगन फ्रूट कमलम (कमळ) या नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी याबाबत घोषणा केली आहे. 

ड्रॅगन फ्रूट या नावाने प्रसिद्ध असलेलं फळ यापुढे गुजरातमध्ये "कमलम" म्हणून ओळखलं जाणार आहे. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे. "राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्याचा बाहेरून आकार हा कमळासारखा आहे. त्यामुळेच आता ड्रॅगन फ्रूटचं नाव हे कमलम असं ठेवण्यात आलं आहे. आम्ही चीनशी संबंधित असलेल्या या फळाचं नाव बदललं आहे. कमलम हा एक संस्कृत शब्द आहे आणि या फळाचा आकार देखील कमळासारखाच आहे. त्यामुळे आम्ही कमलम असं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला" असं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे. 

ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्यामागे कोणतंही राजकारण नसल्याचं देखील विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे. गुजरातमधील काही भागात शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेती करतात. या भागात मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं जातं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ड्रॅगन फ्रूटचे अनेक फायदे आहेत. रक्तदाब, मधुमेह, शारीरीक पेशींचा ऱ्हास यासारख्या आजारांना प्रतिकार करणारे फळ म्हणून ड्रॅगन फ्रूट लोकप्रिय आहे. त्यामुळे आता ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढू लागली आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक ताण-तणावामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा आजारांवर इतर विशेष उपचारांसह प्रतिबंधक उपाय म्हणून ड्रॅगन फ्रूट उत्तम पर्याय असल्याचं मानलं जातं. ड्रॅगन फ्रूट रोगप्रतिकारक शक्ति मजबूत करतं. तसेच वजन कमी करण्यासही मदत करतं. आरोग्यासाठी ड्रॅगन फ्रूट हे अत्यंत गुणकारी मानलं जात असल्याने मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी केली जाते. 

 

टॅग्स :fruitsफळेGujaratगुजरातVijay Rupaniविजय रूपाणी