शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 00:40 IST

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेप्रति तरुणाच्या मनात एकतर्फी आकर्षण होते. मृत तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव कामरान शाहिद पठाण असे आहे.

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात तरुणीसोबत झालेल्या वादानंतर एका तरुणाने हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केली. तरुणीसोबत भांडण झाल्यावर त्याने स्वतःवर पेट्रोल टाकून लायटरने पेटवून घेतले. आग लागल्यानंतर त्याने हॉस्पिटलच्या छतावरून खाली उडी मारली. घटनास्थिळी असलेले लोक त्याला बघतच राहिले. यानंतर, त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण सरखेज येथील अलनूर हॉस्पिटलमध्ये तरुणीला भेटायला आला होता. तरुणीसोबत झालेल्या जोरदार वादानंतर त्याने रुग्णालयात तोडफोड केली. यानंतर त्याने स्वतःवर पेट्रोल ओतून घेत आग लावली आणि हॉस्पिटलच्या छतावरून खाली उडी मारली. खाली पडल्यानंतर, लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीच्या भीषण ज्वाळांमुळे ते शक्य झाले नाही. 

तरुणाची ओळख पटली, तपास सुरू -सरखेज येथील ही घटना अक्षरशः थरकाप उडवणारी आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेप्रति तरुणाच्या मनात एकतर्फी आकर्षण होते. मृत तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव कामरान शाहिद पठाण असे आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८:३० च्या सुमारास घडली. या प्रकरणाची सर्व बाजूंनी कसून चौकशी सुरू आहे, असे एम डिव्हिजनचे एसीपी ए. बी. वाडंद यांनी म्हटले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Lover Commits Suicide After One-Sided Love Argument in Ahmedabad Hospital

Web Summary : In Ahmedabad, a young man committed suicide after arguing with a woman he loved. He set himself on fire and jumped from a hospital roof. The man has been identified; police are investigating.
टॅग्स :Gujaratगुजरातhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसfireआगPetrolपेट्रोल