शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये भाजपाचा पाय खोलात, संघाच्या सर्व्हेमधून आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 22:44 IST

भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये या पक्षाला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ठळक मुद्देभाजपाच्या मतांची टक्केवारी 8 ते 10 नं घसरली आहे.स्थानिक निवडणुकीत काँग्रेसनं 193 जागांपौकी 113 जागांवर विजय मिळवत भाजपाचा पराभव केला होतागेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये सुरू असलेल्या पाटीदार आणि दलित आंदोलनाचा फटका बसू शकतो

अहमदाबाद - भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये या पक्षाला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता येथील विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना भाजपासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.  २०१७ च्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसू शकतो, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्व्हेमधून मिळाली आहे.  आरएसएसने केलेल्या एका सर्व्हेनुसार गुजरात विधानसभेमध्ये भाजपाला 182 पैकी फक्त 60 ते 65 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर काँग्रेसला 100 जागा मिळतील. गुजरातनंतर 2018 मध्ये होणाऱ्या मध्यप्रदेशमधील निवडणुकीतही भाजपाला 57 ते 60 जागांवर समाधान मानवं लागेल. आरएसएसच्या या सर्व्हेत नमूद अंदाज खरा ठरल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीला हा मोठ्ठा धक्का असू शकतो.  

आरएसएसच्या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारी 8 ते 10 टक्क्यांनी घसरली आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेसने 183 जागांपैकी 113 जागांवर विजय मिळवत भाजपाचा पराभव केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 20 आमदार पाच हजारपेक्षा कमी मतांनी निवडून आले होते. गेली वर्ष भाजपा गुजपातमध्ये सत्तेत आहे. आरएसएसच्या सर्वेनुसार या विधानसभा निवडणुकीत मतदार आपला 20 वर्षांचा उद्रेक मतांच्या पेटीतून बाहेर काढू शकतात.  गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये सुरू असलेल्या पाटीदार आणि दलित आंदोलनामुळे भाजपाला कमीतकमी 18 जागांवर परभवाचा सामना करावा लागू शकतो.  

गुजरात विधानसभेच्या निवडणुकींच्या दृष्टीने भाजपाने गेल्या वर्षीपासून तयारी केली केली आहे. मागील सहा महिन्यात नरेंद्र मोदींचे गुजरातचे दौरे वाढले आहेत. राज्याच्या वेगवेगळय़ा भागात जाऊन सभा घेणं, लोकांना भेटणं त्यांनी सुरू केलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे कार्यकर्ते उत्साहात आहेत. मात्र, सर्वसामान्य लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. अनेक वर्षे राज्यात भाजपाची सत्ता असली तरी लोकांच्या वाटय़ाला अद्याप अच्छे दिन आलेले नाहीत, देशभरात चर्चा होणा-या विकासाच्या गुजरात मॉडेलनी लोकांच्या जीवनात अच्छे दिन आणलेले नाहीत. सामान्य माणसांच्या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. आणि म्हणून प्रामुख्याने शेतकरी असलेला पटेल समाज भाजपाच्या राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे.

टॅग्स :GujaratगुजरातAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ