शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Gujarat Assembly Election: रिवाबा, हार्दिक, जिग्नेश, गढवी ते इटालिया; या उमेदवारांबाबत एक्झिट पोल काय सांगतो..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:41 IST

उद्या म्हणजेच 8 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. या निकालांवर संपूर्ण देशाची नजर लागून आङे.

Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. 182 सदस्यीय विधानसभेत काही जागा अशा आहेत, जिथे निकराची लढत पाहायला मिळाली आहे. यामध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ते सर्वात तरुण उमेदवार हार्दिक पटेल आणि आपचे हेवीवेट गोपाल इटालिया यांच्या जागांचा समावेश आहे. जाणून घेऊन काय आहे या जागांचे एक्झिट पोल..

गुजरात विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. विधानसभा निवडणुकीच्या सर्व एक्झिट पोलने पुन्हा एकदा भाजपला दणदणीत विजयाची शक्यता वर्तवली आहे. 182 सदस्यीय विधानसभेत भाजप विक्रमी विजयाकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा आहे. भाजपला 125 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये हेवीवेट उमेदवारांच्या जागांबाबत माहिती देण्यात आली आहे.

1. विरमगाम2017 पूर्वी पाटीदार आंदोलनाद्वारे गुजरातच्या राजकारणात भूकंप आणणारे हार्दिक पटेल अहमदाबाद जिल्ह्यातील विरगाम मतदारसंघातून भाजपचा उमेदवार आहे. पाटीदार आंदोलनानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना कार्याध्यक्ष बनवण्यात आले, परंतु जून 2022 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या जागेवर हार्दिक पटेल हे काँग्रेसचे आमदार लखाभाई भारवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. एक्झिट पोलमध्ये हार्दिक पुढे आहे. ही जागा भाजप काँग्रेसच्या हातून हिसकावून घेत असल्याचे दिसत आहे.

2. खंभालियाइसुदान गढवी हे गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे. या जागेवरून ते निवडणूक लढवत आहेत. एक्झिट पोलमध्ये इसुदान गढवी मागे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येथे भाजपचे मुलुभाई बेरा आघाडीवर असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ही जागा काँग्रेसकडे होती आणि विक्रम मॅडम आमदार होते, पण तेही मागे आहेत.

3. जामनगर उत्तररिवाबा जडेजा ही टीम इंडियातील स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी आहे. जामनगर उत्तर मतदारसंघातून त्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रिवाबा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. एक्झिट पोलमध्ये रिवाबा जडेजा विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेसचे उमेदवार बिपेंद्रसिंह जडेजा आणि आपचे उमेदवार करसनभाई करमूर रिंगणात आहेत.

4. कातरगामसुरत शहरातील या जागेवरून आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया रिंगणात आहेत. एक्झिट पोलमध्ये इटालिया पुढे राहण्याची अपेक्षा आहे. येथे भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार विनू मोराडिया आणि काँग्रेसचे कल्पेश वारिया यांच्याशी इटालियाची लढत आहे.

5. वडगामकाँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी येथून दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. गेल्या वेळी मेवाणी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झाले होते. यावेळी ते काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत. येथून मेवाणी पुन्हा विजयी होण्याची शक्यता आहे. मेवाणी यांना घेराव घालण्यासाठी भाजपने येथून माजी आमदार मणिलाल वाघेला यांना उमेदवारी दिली आहे. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस