शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वीस आमदार घेऊन या अन् मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची उपमुख्यमंत्र्यांना विधानसभेत ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 08:34 IST

राज्यसभा निवडणुकीच्या आधी गुजरातमध्ये खळबळ

अहमदाबाद: गुजरातमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी २६ मार्चला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण तापलंय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री नितीन पटेल राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. काँग्रेसनं पटेल यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलीय. विशेष म्हणजे काँग्रेसनं पटेल यांना विधानसभेत मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे गुजरातमधलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राप्रमाणाचे सध्या गुजरातमध्येही विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. काल प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अमरेली जिल्ह्यातल्या लाठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विरजी ठुमरने यांनी अचानक उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचं नाव घेतलं. वीस आमदारांसह भाजपा सोडा आणि काँग्रेसमध्ये या, अशी थेट ऑफरच विरजींनी दिली. 'तुम्ही २० आमदारांसह काँग्रेसमध्ये या. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू,' असं विरजी विधानसभेत म्हणाले. यानंतर विधानसभेत गोंधळ झाला. काँग्रेसनं थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यानं भाजपा काहीशी बॅकफूटवर गेली. त्यांनी लगेचच पटेल यांचा बचाव सुरू केला. काँग्रेस पटेल यांना लक्ष्य करत असल्याचं भाजपानं म्हटलं. राजकीय रणनीतीकारांच्या अंदाजानुसार, राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं वेगळी व्यूहनीती आखली आहे. गुजरातमधल्या राज्यसभेच्या जागांसाठी झालेल्या गेल्या काही निवडणुकांआधी काँग्रेसच्या आमदारांनी कमळ हाती घेतल्यानं भाजपाला फायदा झाल्याचं पाहायला मिळालंय. यामुळेच यंदा काँग्रेसनं आधीच भाजपाला लक्ष्य करत स्वत:च्या आमदारांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं चांगली कामगिरी करत ८१ जागा जिंकल्या. काँग्रेसच्या जागांमध्ये २० जागांची वाढ होत असताना भाजपाच्या आमदारांची संख्या मात्र ११५ वरुन ९९ वर आली. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजपाला प्रत्येकी दोन जागा मिळू शकतात. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसला एक अधिकची जागा मिळेल. 

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेस