दोषींना क्षमा नाही; गृहमंत्री राजनाथसिंग

By Admin | Updated: February 22, 2015 00:04 IST2015-02-22T00:04:06+5:302015-02-22T00:04:06+5:30

कॉर्पोरेट हेरगिरी प्रकरणात सामील दोषींना कदापि सोडणार नाही आणि त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शनिवारी दिली.

The guilty are not forgiven; Home Minister Rajnath Singh | दोषींना क्षमा नाही; गृहमंत्री राजनाथसिंग

दोषींना क्षमा नाही; गृहमंत्री राजनाथसिंग

नवी दिल्ली : कॉर्पोरेट हेरगिरी प्रकरणात सामील दोषींना कदापि सोडणार नाही आणि त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शनिवारी दिली.
दिल्ली पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले सिंग यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना या प्र्रकरणात मध्यस्थ आणि काही सरकारी अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असण्याची शक्यताही फेटाळली नाही. तसेच चौकशीची व्याप्ती इतर मंत्रालयांपर्यंत वाढविण्याचे संकेत दिले. मध्यस्थाच्या भूमिकेशी संबंधित एका प्रश्नाच्या उत्तरात सिंग यांनी संगितले की, असे शक्य आहे आणि मी कुठलीही शक्यता नाकारत नाही. दिल्ली पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत असून वस्तुस्थिती समोर येईल.
 

Web Title: The guilty are not forgiven; Home Minister Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.