रुग्णवाहिकेला मार्ग देण्याबाबत चालकांना मार्गदर्शन
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:12+5:302015-02-14T23:51:12+5:30
नवी मुंबई : रुग्णवाहिकेला मार्ग देण्यासंदर्भात एपीएमसी येथे वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक पोलीस आणि राधी फाऊंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रुग्णवाहिकेला मार्ग देण्याबाबत चालकांना मार्गदर्शन
न ी मुंबई : रुग्णवाहिकेला मार्ग देण्यासंदर्भात एपीएमसी येथे वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक पोलीस आणि राधी फाऊंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.एपीएमसी येथील ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्याने रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन जात असताना इतर खाजगी वाहनांनी रस्ता मोकळा करून देणे आवश्यक असते. अनेकदा रुग्णवाहिकेला मोकळा मार्ग न मिळाल्याने त्यामधील रुग्णाला रुग्णालयात पोचण्यास विलंब होत असतो. या प्रकारात गंभीर रुग्णाचे प्राण देखील गमावू शकतात. त्यामुळे रुग्णवाहिका जात असताना इतर वाहनांनी मार्ग मोकळा करणे आवश्यक असते. मात्र अनेक वाहनचालकांना याबाबतचे गांभीर्य माहीत नसल्याने रुग्णवाहिकेला प्राधान्य मिळत नाही. त्यानुसार चालकांमध्ये रुग्णवाहिकेबाबत जनजागृती करण्यासाठी शनिवारी एपीएमसी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित ट्रक चालकांना रुग्णवाहिकेला प्राधान्य देण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास वाहतूक पोलीस निरीक्षक विनायक निकम, डॉ. रिटा साळवा यांच्यासह रिक्षा व ट्रकचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)