लगीन ठरलया! इशांत शर्मा 9 डिसेंबरला चढणार बोहल्यावर
By Admin | Updated: November 3, 2016 19:22 IST2016-11-03T19:22:58+5:302016-11-03T19:22:58+5:30
अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा 9 डिसेंबरला बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह हिच्यासोबत विवाहबंधानात अडकणार आहे.

लगीन ठरलया! इशांत शर्मा 9 डिसेंबरला चढणार बोहल्यावर
>ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 3 - टीम इंडियातील अजून एक आघाडीचा गडी आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनुभवी गोलंदाज इशांत शर्माच्या लग्नाची तारीख निश्चित झाली असून, इशांत 9 डिसेंबरला बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह हिच्यासोबत विवाहबंधानात अडकणार आहे.
इशांत शर्मा आणि प्रतिमा सिंह यांचा साखरपुडा 19 जूनला झाला होता. आता 9 डिसेंबरला या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, इशांत आणि प्रतिमा यांना वाराणसीमधील गंगा घाटावर गंगाआरती करताना पाहण्यात आले होते.
देशातील आघाडीच्या महिला बास्केटबॉलपटूंपैकी एक असलेल्या प्रतिमा सिंह हिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध बास्केटबॉल स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आशियाई क्रीडास्पर्धेमध्येही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले असून, तिने भारतीय संघाचे कर्णधारपदही सांभाळले आहे. प्रतिमा पाच बहिणींमध्ये सर्वात छोटी असून, या पाचही बहिणी बास्केटबॉलपटू आहेत.