गुढीपाडवा
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:02+5:302015-03-20T22:40:02+5:30
गुढीपाडवा...आनंद वाढवा!

गुढीपाडवा
ग ढीपाडवा...आनंद वाढवा!नववर्षाच्या स्वागतासाठी सजली उपराजधानी : सामाजिक अस्मितेचा ध्वज उंचावणारनागपूर : गुढीपाडवा अर्थात हिंदू मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज झाले आहेत. गुढी हे स्वातंत्र्याचे, विजयाचे प्रतीक आहे. विजय ध्वज म्हणून गुढीचा उल्लेख केला आहे. शनिवारी ही गुढी घराघरांसोबत सामाजिक अस्मितेचा ध्वजदेखील उंचावणार आहे. शहरातील जुन्या-नव्या वस्त्यांमध्ये नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी असून पहाटेपासूनच उपराजधानी मंगलमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवसाचे स्वागतच पाडवा पहाट म्हणजे सुमधूर स्वरांच्या मैफिलीने होणार आहे. शहरातील विविध संस्थांनी यांचे आयोजन केले आहे. शिवाय त्यानंतर सकाळच्या सुमारासच महाल, धरमपेठ, रामनगर इत्यादी परिसरात महिलांच्या बाईक रॅलीचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. सोबतच विविध चौकांमध्ये सामाजिक समरसतेचा संदेश देणाऱ्या गुढी उभारण्यात येणार आहे. पश्चिम नागपुरातील प्रतापनगर, लक्ष्मीनगर, धरमपेठ, बजाजनगर येथे रस्त्याच्या कडेला भगव्या रंगाच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. शिवाय शहरात मिरवणूका काढण्यात येणार असून यात लेझीम, ढोल, झांज, कीर्तन अशा विविध पथकांचा समावेश राहणार आहे. ज्या मार्गावरून ही स्वागतयात्रा जाणार तेथे भव्य रांगोळ्या साकारण्यात येणार आहेत.मावळत्या वर्षाला सलामशहरातील महिलांमध्ये नव्या वर्षाबाबत विशेष उत्साह दिसून येत आहे. वर्षाच्या शेवटच्या सायंकाळी मावळत्या सूर्याला निरोप देण्यासाठी शहरात विशेष बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सीताबर्डी, महाल, धरमपेठ इत्यादी मार्गावरुन ही रॅली गेली. नऊवारी साडी आणि नथीसह पारंपरिक वेशभूषेत दुचाकी चालवत असलेल्या तरुणी व महिलांच्या उत्साहाला जनतेनेदेखील मोकळा मार्ग देऊन त्यांचे कौतुक केले.चौकटसंघ स्वयंसेवकांमध्ये विशेष उत्साहदरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त महाल परिसरात विशेष उत्साह दिसून येत आहे. या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे व देशातील सत्ताबदलामुळे संघ स्वयंसेवकांमध्ये यंदा जास्त उत्साह दिसून येत आहे. याचेच प्रतिबिंब या उत्सवानिमित्त दिसून येणार आहे. संघ मुख्यालय तसेच रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातदेखील सरसंघचालकांच्या उपस्थितीत गुढी उभारण्यात येणार आहे. सायंकाळच्या सुमारास रेशीमबाग परिसरात संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने एकत्रित येण्याची शक्यता आहे.