गुदगुल्या ‘याला’; हसणार ‘तो’ ही

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:24+5:302015-03-14T23:45:24+5:30

या जुळ्या भावांची कथा काही औरच. लहानपणी यांच्यातील एकाला गुदगुल्या केल्या की दुसराही आपोआप हसणार. एकाच्या हातून ग्लास खाली पडला की काही वेळाने दुसर्‍याच्या हातातूनही तो पडणारच.

Gudgulea 'Yala'; He will 'laugh' | गुदगुल्या ‘याला’; हसणार ‘तो’ ही

गुदगुल्या ‘याला’; हसणार ‘तो’ ही

जुळ्या भावांची कथा काही औरच. लहानपणी यांच्यातील एकाला गुदगुल्या केल्या की दुसराही आपोआप हसणार. एकाच्या हातून ग्लास खाली पडला की काही वेळाने दुसर्‍याच्या हातातूनही तो पडणारच.
सोलापुरात मोदी भागातील हुडको नगरमध्ये राहणारे व सहकार खात्यातील निवृत्त ऑडिटर असलेले अशोक भुताळी व्हनगावडे व सुनीता व्हनगावडे यांची सूर्यकांत व चंद्रकांत ही जुळी मुले. यांच्या घरात सुनीता यांच्या बहिणीला दोन जुळे आहेत.
14 मार्च 1978 ही सूर्यकांत व चंद्रकांत यांची जन्मतारीख. म्हणजे आजच दोघांचाही वाढदिवस. सूर्यकांत हे पुणे विद्यापीठात नॅक व सांख्यिकी विभागात कनिष्ठ सहायक तर चंद्रकांत हे पुण्यातच विप्रो टेक्नॉलॉजीमध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. दोघांचे शालेय शिक्षण सिद्धेश्वर प्रशालेत तर महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वरमध्ये झाले. चंद्रकांत यांनी वालचंदमधून इंजिनिअरिंग केले. दिसायला अगदी सेम टू सेम असल्यामुळे यांना ओळखण्यात सर्वांचीच फसगत होते. दोघेही आजोबांचे खूपच लाडके होते.


डायना क्रॉलचे जुळे
कॅनडियन गायिका, गीतकार, पियानिस्ट डायना क्रॉल व ब्रिटिश संगीतकार एल्व्हिस कॉस्टेलो हे जुळ्यांचे माता-पिता आहेत.त्यांचा विवाह 6 डिसेंबर 2003 रोजी तर डेक्स्टर हेन्री लॉर्कन व फ्रँक आर्लन जेम्स या जुळ्यांचा जन्म 6 डिसेंबर 2006 रोजी झाला.

Web Title: Gudgulea 'Yala'; He will 'laugh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.