पालकमंत्र्यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:43+5:302015-02-21T00:49:43+5:30

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करणार्‍या समाजकंटकांना अटक करावी, यासाठी मागणीसाठी चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांची पालकमंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांचे म्हणणे पोहचविण्याचे आश्वासन बापट यांनी यावेळी दिले.

Guardian Minister took the meeting with the agitators | पालकमंत्र्यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट

पालकमंत्र्यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट

णे : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करणार्‍या समाजकंटकांना अटक करावी, यासाठी मागणीसाठी चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांची पालकमंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांचे म्हणणे पोहचविण्याचे आश्वासन बापट यांनी यावेळी दिले.
डॉ. दाभोलकर व पानसरे यांच्यावर हल्ला करणारे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. याच्या निषेधार्थ विविध पुरोगामी संघटनांचे तरूण कार्यकर्ते मंगळवारपासून विठ्ठल रामजी शिंदे पुलावर उपोषणास बसले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यात शासनाला जोपर्यंत यश मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. या कार्यकर्त्यांची बापट यांनी शुक्रवारी सायंकाळी भेट घेतली. उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली.
राजन दांडेकर, हनुमंत पवार, हर्षल लोहोकरे, अश्विनी सातव हे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. बेमुदत उपोषणच सुरु ठेवणार असल्याच्या भूमिकेवर कार्यकर्ते ठाम असून हल्लेखोरांना अटक झाल्याशिवाय उपोषण थांबविणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपोषणाला विविध संघटना व कार्यकर्त्यांचा पाठिंबा वाढत आहे. शुक्रवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास सोनवणे, मुक्ता दाभोलकर, सुनिती सु. र. साहित्यिक राजन खान यांनी कार्यर्त्यांची भेट घेत उपोषणाला पाठिंबा दिला.
--------------
-

Web Title: Guardian Minister took the meeting with the agitators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.