जिल्ह्यासाठी तातडीने पालकमंत्र्यांची नियुक्त करावी
By Admin | Updated: December 15, 2014 23:31 IST2014-12-15T23:31:14+5:302014-12-15T23:31:14+5:30
मूर्तिजापूर: राज्य मंत्रिमंडळ गठित होऊन कारभारास सुरुवात झाल्यानंतरही जिल्ह्याला आतापर्यंत पालकमंत्री मिळालेला नाही. सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून, इतरही समस्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे शासनाने अकोला जिल्ह्यासाठी तातडीने पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी युवासेनेचे जिल्हा समन्वयक अप्पू तिडके यांनी एका निवेदनाद्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यासाठी तातडीने पालकमंत्र्यांची नियुक्त करावी
म र्तिजापूर: राज्य मंत्रिमंडळ गठित होऊन कारभारास सुरुवात झाल्यानंतरही जिल्ह्याला आतापर्यंत पालकमंत्री मिळालेला नाही. सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून, इतरही समस्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे शासनाने अकोला जिल्ह्यासाठी तातडीने पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी युवासेनेचे जिल्हा समन्वयक अप्पू तिडके यांनी एका निवेदनाद्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.जिल्ह्याला सध्या पालकमंत्री नसल्यामुळे समस्या निकाली काढण्याबाबत कोणाकडे आग्रह करावा, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील लोकांना सध्या पाणीटंचाई, चाराटंचाई, शेतकर्यांना विद्युत पुरवठा न मिळणे, भारनियमन यासारख्या विविध समस्या भेडसावत आहेत. या व इतर समस्या निकाली काढण्यासाठी जिल्ह्याकरिता पालकमंत्री असणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने जिल्ह्याकरिता पालकमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा समन्वयक अप्पू तिडके, माजी शिवसेना तालुकाध्यक्ष राजू दहापुते, युवासेना शहरप्रमुख शिवा गव्हाणे, तालुकाप्रमुख रुपेश कडू, रामेश्वर तायडे, हेमंत कांबे, ऋषिकेश डिके, राहुल आटेकर, अंगद ठाकरे, रवी काकडे, अनिल गावंडे, जय ग्याने, शेखर मोरे, रवी मार्तंड, निखिल टोम्पे, सुरज कैथवास, किरण नवघरे, नितीन आंबीलकर, महेश शेगोकार, नितीन सुरजुसे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)