बलात्काराच्या आरोपावरून पहारेकरी अटकेत

By Admin | Updated: July 1, 2017 01:08 IST2017-07-01T01:08:27+5:302017-07-01T01:08:27+5:30

फ्रेंच महिलेवर (६५) बलात्कार केल्याच्या आरोपावरून ओम प्रकाश या पहारेकऱ्याला मिर्झापूर जिल्ह्यातील त्याच्या भावाच्या घरी

The guard kept the accused on the charge of rape | बलात्काराच्या आरोपावरून पहारेकरी अटकेत

बलात्काराच्या आरोपावरून पहारेकरी अटकेत

वाराणसी : फ्रेंच महिलेवर (६५) बलात्कार केल्याच्या आरोपावरून ओम प्रकाश या पहारेकऱ्याला मिर्झापूर जिल्ह्यातील त्याच्या भावाच्या घरी अटक करण्यात आली. ही महिला वर्षभरापासून येथील शुलटंकेश्वर भागात भाड्याच्या घरात राहत असून ओमप्रकाश हा तेथेच कामाला आहे.
बुधवारी रात्री तो तिच्या घरात शिरला. तिने त्याला विरोध करताच तिला त्याने मारहाण करून तिचा मोबाइल फोन हिसकावला, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नितीन तिवारी यांनी सांगितले. त्यानंतर तो घटनास्थळाहून निघून गेला.
गेल्या दहा वर्षांपासून ही महिला वाराणसीला नियमितपणे येते. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. महिलेच्या तक्रारीवरून ओमप्रकाशविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: The guard kept the accused on the charge of rape