शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

GST कौन्सिलच्या बैठकीत दिल्ली-पंजाबचे अर्थमंत्री आणि निर्मला सीतारामन यांच्यात वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 15:38 IST

आपशासिक दिल्ली आणि पंजाबच्या अर्थमंत्र्यांनी GST ला पीएमएलए कायद्यांतर्गत आणण्यास विरोध करत आहेत.

GST Council Meeting News: राजधानी दिल्लीत GST ची 50 वी बैठक सुरू आहे. या बैठकीत दिल्ली आणि पंजाबच्या अर्थमंत्र्यांचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी वाद झाल्याची बातमी समोर आली आहे. या दोन्ही राज्यात आम आदमी पक्षाची सत्ता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली आणि पंजाब, दोन्ही राज्ये जीएसटीला पीएमएलए म्हणजेच मनी लाँडरिंग अंतर्गत आणण्यास विरोध करत आहेत.

मंगळवारी (11 जुलै) जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा आणि दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना यांचा निर्मला सीतारामन यांच्याशी वाद झाला. या बैठकीत ऑनलाइन गेम आणि घोड्यांच्या शर्यतींवर किती जीएसटी लावावा यावर चर्चा होणार आहे. याशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घ्यावा लागणार आहे.

GST कौन्सिलच्या या बैठकीत ऑनलाइन गेमिंगवरील कर, इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) क्लेम करण्यासाठी नियम कडक करण्यावर विचार केला जाऊ शकतो. याशिवाय सिनेमा हॉलमधील खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त करण्यासोबतच कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या डायनूट्युक्सिमॅब या औषधावरही करमाफीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सिनेमा हॉल मालकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI)ने सिनेमा हॉलमध्ये विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांच्या विशिष्ट श्रेणींवरील कर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या त्याच्यावर 18 टक्के कर आहे, जो कमी करून 5 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये विशेषतः पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक्स यांसारख्या इतर खाद्यपदार्थांवर कर कमी केला जाऊ शकतो. या गोष्टी सिनेमा मालकांसाठी कमाईचे महत्त्वाचे स्रोत आहेत. याद्वारे ते एका वर्षात 30 ते 32 टक्के कमावतात. तसेच, 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चित्रपटांच्या तिकिटांवर सध्या 12 टक्के कर आकारला जातो, तर त्या मर्यादेपेक्षा जास्त तिकिटांवर 18 टक्के जीएसटी लागू होतो.

केंद्राच्या अध्यादेशावरुन केंद्र आणि आपमध्ये वाददुसरीकडे, दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदली-पोस्टिंगच्या अधिकारावरुन केंद्र आणि आप सरकारमध्ये वाद सुरू आहे. या प्रकरणी दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केंद्राच्या अध्यादेशाला आव्हान दिले असून, त्यावर सुनावणी सुरू आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनGSTजीएसटीAAPआपdelhiदिल्लीPunjabपंजाबbusinessव्यवसाय