भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ दोन वर्षांच्या उच्चांकावर
By Admin | Updated: August 29, 2014 19:25 IST2014-08-29T19:25:31+5:302014-08-29T19:25:31+5:30
उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि खाण उद्योगामध्ये झालेल्या वाढीच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था एप्रिल ते जून २०१४ या तिमाहीत ५.७ टक्क्यांच्या गतीने वाढली असून हा वेग गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक आहे

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ दोन वर्षांच्या उच्चांकावर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि खाण उद्योगामध्ये झालेल्या वाढीच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था एप्रिल ते जून २०१४ या तिमाहीत ५.७ टक्क्यांच्या गतीने वाढली असून हा वेग गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक आहे.
गेल्या आर्थिक वर्षातल्या एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा वेग ४.७ टक्के होता, हे विचारात घेता यंदाच्या तिमाहीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये उत्पादन क्षेत्र १.५ टक्क्यांनी आक्रसले होते, तर यंदा या क्षेत्राची वाढ ३.५ टक्के दराने झाली आहे.
आर्थिक सेवाक्षेत्रााची वाढ १०.३ टक्क्यांनी झाली आहे तर खाणक्षेत्रही २.१ टक्क्यांच्या गतीने वाढले आहे जे एका वर्षापूर्वी ३.९ टक्क्यांनी घटले होते.
बांधकाम क्षेत्राची वाढ गेल्या एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये १.१ टक्क्यांनी झाली होती, जी यंदा ४.५ टक्क्यांची झाली आहे. त्यामुळे येता काळ आर्थिक वाढीच्या दृष्टीने चांगला असेल असा कयास अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे.