शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कहो दिल से, ZP फिर से... सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 09:03 IST

उत्तर प्रदेश, केरळात वाढती पटनोंदणी

ठळक मुद्दे६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांची खासगी शाळांतील पटनोंदणीचे प्रमाण २०१८ मध्ये होते, ते २०२१ मध्ये कमी होत २४.४ टक्क्यांवर आले आहे

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांत विद्यार्थ्यांचा कल खासगी शाळांऐवजी सरकारी शाळांकडे वाढला आहे. वार्षिक शिक्षा स्थिती अहवालातून (एएसईआर-२०२१) ही बाब समोर आली आहे. २५ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सर्वेक्षणात ७६,७०६ घरे आणि  पाच ते १६ वर्षे वयोगटातील ७५,२३४ मुलांचा समावेश होता. अखिल भारतीय स्तरावर खासगी शाळांकडून सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे स्पष्ट दिसते.

६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांची खासगी शाळांतील पटनोंदणीचे प्रमाण २०१८ मध्ये होते, ते २०२१ मध्ये कमी होत २४.४ टक्क्यांवर आले आहे, असे बुधवारी जारी करण्यात आलेल्या  एएसईआरच्या १६व्या अहवालात म्हटले आहे. सर्व वर्ग आणि मुला-मुलींमध्ये  हा बदलात कल दिसून आला आहे. तथापि, खासगी शाळांत प्रवेश घेण्याचा कल  आजही मुलींपेक्षा मुलांमध्ये अधिक आहे. अहवालानुसार सरकारी शाळांमध्ये २०१८ मध्ये सरासरी ६४.३ टक्के प्रवेश झाले.  मागच्या वर्षी हे प्रमाण ६५.८ टक्क्यांवर गेले. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत प्रवेश नोंदणी करण्याचे प्रमाण  यावर्षी ७०.३ टक्क्यांवर पोहोचले. २००६ ते २०१४ पर्यंत मात्र विद्यार्थ्यांचा खासगी शाळेतील प्रवेश नोंदणीच्या संख्येत सातत्याने वाढ झाली.

१३.२ टक्क्यांनी वाढ अहवालानुसार सरकारी शाळांत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे प्रमाण विशेषतः उत्तर प्रदेशात १३.२ टक्क्यांनी वाढले असून, त्यानंतर केरळमध्ये  हे प्रमाण १.९ टक्क्यांनी वाढले आहे.  त्यानंतर राजस्थान (९.४ टक्के), महाराष्ट्र (९.२ टक्के), कर्नाटक (८.३ टक्के), तामिळनाडू (९.६ टक्के), आंध्र प्रदेश (८.४ टक्के), तेलंगण (३.७ टक्के, बिहार (२.८ टक्के), प. बंगालमध्ये ३.९ आणि झारखंडमधील सरकारी शाळांत प्रवेश घेण्याचे प्रमाण २.५ टक्क्यांनी वाढले आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षणSchoolशाळा