वृध्देवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:18+5:302015-02-14T01:07:18+5:30

नशाखोर आरोपींचे कृत्य : एमआयडीसीतील घटना

Gross gang rape | वृध्देवर सामूहिक बलात्कार

वृध्देवर सामूहिक बलात्कार

ाखोर आरोपींचे कृत्य : एमआयडीसीतील घटना
नागपूर : नशेत तर्र असलेल्या नराधमांनी वृध्दाला मारहाण करून झोपडीबाहेर काढले आणि त्याच्या वृध्द पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ११ वाजता ही संतापजनक घटना घडली.
पीडित महिला ६० वर्षांची आहे. ती आपल्या वृध्द पतीसोबत हिंगणा - वानाडोंगरी मार्गावर झोपडपट्टीत राहते. गुरुवारी रात्री जेवण केल्यानंतर वृध्द दाम्पत्य आपल्या झोपडीत झोपले. सर्वत्र सामसूम असताना दारूच्या नशेत तर्र असलेले २५ ते ३० वयोगटातील तीन नराधम झोपडीत आले. त्यांनी वृध्दाला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली आणि मारहाण करीतच वृध्देवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. अत्यंत गरीब आणि वृद्ध असलेले हे दाम्पत्य या अमानुष प्रकारामुळे एवढे हादरले की त्यांनी मदतीसाठी आरडाओरड करण्याचीही हिंमत दाखवली नाही. नराधम पळून गेल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना अत्याचाराची माहिती दिली. त्यामुळे आज सकाळपासून झोपडपट्टीत संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना सूचना देण्यात आली. माहिती कळताच एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, एपीआय गोरे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. त्यांनी पीडित महिलेवर औषधोपचार करून घेतल्यानंतर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू केली. आज सकाळपासून एक डझनपेक्षा जास्त संशयितांची चौकशी केली. त्यातील दोघांनी हे अमानुष कृत्य केल्याची सायंकाळी कबुली दिली. त्यांचा एक साथीदार फरार असल्यामुळे पोलिसांनी या दोघांची नावे उघड करण्याचे टाळले.
वारांगनेमुळे घडली घटना
या परिसरात काही वारांगना वेश्याव्यवसाय करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, अशाच एका वारांगनेच्या शोधात आरोपी फिरत होते. त्यांना ती मिळाली नाही. त्यामुळे या नराधमांनी वृद्धेवर पाशवी अत्याचार केला.
--
सोनेगावच्या घटनेची पुनरावृत्ती
दोन महिन्यांपूर्वी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना घडली होती. तीन नराधमांनी एका असहाय वृध्देवर पाशवी अत्याचार केला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महिलांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दोनदा मोर्चे काढले होते. या घटनेची पुनरावृत्ती आता एमआयडीसीत घडली.
-------

Web Title: Gross gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.