शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट्स चॅनेलचा प्रमुख असल्याचं सांगत त्याने सहा जणींना घातला लाखोंचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 14:13 IST

तो व्यक्ती मेट्रोमोनिअल साइट्सवर महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालत होता.

नवी दिल्ली- बुधवारी द्वारकाच्या सायबर सेल विभागाने एका 41 वर्षीय व्यक्तीला अटक केली. स्पोर्ट्स चॅनेलचा प्रमुख असल्याचं सांगत तो व्यक्ती मेट्रोमोनिअल साइट्सवर महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालत होता. या व्यक्तीने सहा महिलांना लुबाडलं असावं, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षापासून ही व्यक्ती महिलांना लग्नाची मागणी घालून व नंतर ब्लॅकमेल करून लुटत होती. अनुराग मेंदीरत्ता असं या माणसाचं नाव असून त्याने लखनऊमधून बीबीएचं शिक्षण घेतलं आहे. तसंच त्याने तीन खासगी बँकांमध्ये सेल्स मॅनेजरपदावर कामही केली आहे. या व्यक्तीकडून लुबाडलं गेलेल्या एका महिलेने गेल्यावर्षी पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांना सापळा रचत अनुरागचा आयपी अॅड्रेस ट्रॅक करून त्याला अटक केली. दुसऱ्या एका महिलेनेही अनुराग विरोधात तक्रार दाखल केल्याचं तपासात समोर आलं आहे.अनुराग हा मेट्रोमोनिअल साइट्सवर टार्गेट फिक्स करायचा. त्यानंतर त्या मुलीच्या आवडीनिवडीनुसार स्वतःची फेक प्रोफाइल त्याच साइटवर तयार करायचा. एका प्रकरणात त्याने स्वतःची ओळख सिद्धार्थ वालिया अशी तयारी केली. आपण मुंबईतील एका स्पोर्ट्स चॅनेलचा प्रमुख असल्याचं त्याने सांगितलं. तसंच स्वतःचा तसा फोटोही काढून घेतला. लग्नासाठी मुलीच्या शोधात असल्याचं सांगत त्याने एका मुलीशी चॅटिंग करायला सुरुवात केली.  काही दिवसांनंतर महिलेकडून पैसे उकळण्यासाठी त्याने वडिलांना कॅन्सर असल्याची खोटी कहाणी तयार केली. एके दिवशी त्याने महिलेला युकेच्या नंबरवरून फोन केला होता. वडिलांच्या उपचारासाठी लंडनला आलो असल्याचं त्याने सांगितलं. त्यासाठी सहा लाख रुपयांची गरज आहे, असं म्हणत त्याने त्या महिलेकडून पैसे उकळले. 

अनुरागकडे असलेल्या एका डिव्हाइसवरून तो विविध देशातील आयएसडी कोड वापरून फोन करत होता. अनुरागचं फेक जिमेल आयडी त्याच्या फेसबुक व इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर लिंक होतं, अशी माहिती समोर आली आहे.काही दिवसांनी महिलेने पैसे परत मागितल्यावर अनुरागने तिला शिवीगाळ करायला सुरूवात केली. नंतर महिलेने मुंबईतील स्पोर्ट्स चॅनेलचं ऑफिस गाठलं. तेव्हा अनुरागची प्रोफाइल फेक असल्याचं तिच्या लक्षात आलं. अनुरागने सिद्धार्थ ऑबेरॉय नावाची प्रोफाइल तयार करत आणखी एका महिलेला गंडा घालण्याचा प्रयत्न केला. दुबईमध्ये एका स्पोर्ट्स चॅनेलचा प्रमुख असल्याचं सांगत त्याने महिलेला लग्नासाठी तयार केलं. व त्यानंतर तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली होती.पोलीस चौकशीत अनुरागने सगळ्या गुन्ह्यांची कबूली दिली आहे. माझं लग्न झालं असून मला एका मुलगा आहे. मी नोकरी सोडली व त्यानंतर प्रॉपर्टी डिलर म्हणून द्वारकामध्ये काम करतो आहे, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, अनुरागच्या पत्नीला याबद्दल माहिती आहे की नाही? याबद्दलचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाNew Delhiनवी दिल्ली